pakoda recipe/पकोडे रेसिपी

पकोडे हा पदार्थ सगळ्यांच्याच आवडीचा आहे. पावसाच्या मोसमात पकोडेची खूप डिमांड केली जाते. तर पाहूया क्रिस्पी पकोडे कसं बनवायचं.

1.कांदा भजे रेसिपी

साहित्य

चार कापलेले कांदे, लाल तिखट, चवीनुसार मीठ, जिरे कूट, वाटून घेतलेला लसूण, चिमूटभर सोडा, बारीक चिरलेली कोथिंबीर, डाळीचे पीठ, आणि हळद.

सर्वात आधी कांदा भजी बनवताना आपण एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घ्यावा. बारीक लेअर चा असा लांबट लांबट चिरून घेतल्यास त्यावर मीठ टाकावे व तो त्यात मिसळून घ्यावा जेणेकरून कांद्याचे लेअर असे वेगवेगळे होतील. त्यानंतर त्यावर लाल तिखट टाकून घ्यावे नंतर त्यात लसूण पेस्ट करून टाकावे जिरे कुठून टाकावेत. नंतर बेसन पीठ टाकावे त्यानंतर बारीक चिरून कोथिंबीर टाकावे. व ते सगळे मिश्रण एकदा मिक्स करून घ्यावे.

नंतर त्यावर थोडं थोडं पाणी टाकून त्याला मिक्स करून घ्यावे पाण्याचे प्रमाण जरा कमीच ठेवा नाहीतर पातळ झाल्यास भजे आपले नीट गोल होणार नाहीत. कांदा भजी करताना बेसन पीठ कमी आणि कांदा जास्त असला तरच त्याला चव येते. त्यानंतर त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. थोडेसे तांदळाचे पीठ टाकल्यास भजे खुसखुशीत होतात.

ते मिश्रण आपण थोड्यावेळ झाकून ठेवूयात. थोडा वेळ झाल्यास आपण भजे तळून घेऊयात त्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यात भजे तळण्यासाठी तेल टाकून घेऊयात. तेल गरम झाल्यास आपण भजी तळून घेऊयात त्याआधी त्या मिश्रणात थोडासा चुटकीवर सोडा टाकूयात ज्यामुळे भजे चांगले फुगते व खुसखुशीत होते. तर आता आपण भजी तळून घेऊयात. तेलात टाकल्यास जोपर्यंत ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत भजी एका बाजूने तळून घ्यावी दोन्हीकडून चांगली भाजून झाल्यास त्याला एका मोठ्या चाळणीने बाहेर काढून घेऊयात भज्याचा तेल खाली उतरवण्यासाठी आपण एक प्लेटमध्ये टिशू पेपर ठेवण्यात व त्यावर भजी टाकूया जेणेकरून टिशू पेपर भजीचे उरलेले तेल ओढून घेईल व भजे जास्त तेलकट राहणार नाही.

तर तयार आहे आपली खुसखुशीत कांदा भजी चहा सोबत सुद्धा स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. नक्की करून पहा एकदम खुसखुशीत होतील जर तुम्ही अशा प्रकारे भजे केला तर.

2. आलू/बटाटा भजे रेसिपी

आलू भजी बनवताना आपण दोन प्रकारे बनवू शकतो एकतर आलो आपण खिसणीने बारीक खिसून घेऊन त्यात टाकू शकतो किंवा चिप्स सारखे मोठे मोठे काप करून घेऊ शकतो तर आधी आपण खिसणीने खिसून कसे करायचे ते बघूयात.

1.बटाटा भजी

साहित्य

 बारीक किसलेले दोन आलू,लाल तिखट, चवीनुसार मीठ, जिरे कूट, वाटून घेतलेला लसूण, चिमूटभर सोडा, बारीक चिरलेली कोथिंबीर, डाळीचे पीठ, आणि हळद.

तर एका बॉल मध्ये आपण दोन मोठे आलू किसने बारीक खिसून घेऊयात त्यावर थोडेसे मीठ टाकून मिक्स करून घेऊयात नंतर बेसन पीठ टाकून घेऊयात त्यात जिरे आणि ओव्याचा कोट टाकूया त्यानंतर लसूण पेस्ट करून आपण त्यात टाकूयात शेवटी लाल तिखट टाकून ते सगळे मिश्रण मिसळून घेऊयात आलू किसून घेतल्यामुळे त्यात थोडेसे पाणी राहते त्यामुळे पाण्याचा प्रमाण कमीच ठेवावे वरून पाणी टाकताना आपण थोडं थोडं करून टाकावी जेणेकरून पाणी जास्त होणार नाही आणि कालवण जास्त पातळ होणार नाही. तरी भजी क्रिस्पी बनवण्यासाठी आपण यातही थोडेसे तांदळाचे पीठ टाकून घेऊयात.

या मिश्रणत सोडा नाही टाकला तरी चालतो.

नंतर आपण ही आलू भजी तळून घेऊयात गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल गरम होण्यासाठी ठेवण्यात नंतर आपण भजी एक एक तेलात सोडूयात ते चांगले दोन्ही बाजूंनी तळून झाल्यास त्याला मोठ्या चाळणीने बाहेर काढून घेऊ या ह्या भाज्यांना जास्तीत सुटते त्यामुळे आपण ते एका प्लेटमध्ये टिशू पेपर घेऊन त्यावर टाकण्यात जेणेकरून त्या भज्याचा सुटलेलं तेल टिशू पेपर ओढून घेईल.

तर तयार आहे आपली क्रिस्पी आलूची भजी. तर नक्की करून पहा अशा प्रकारची वेगळी आलू ची भाजी ही पण एक आपण स्नॅक्स म्हणून चहा सोबत घेऊ शकता.

तर आपण आता पाहणार आहोत आलूचे दुसरे प्रकारचे भजे.

2.बटाटा भजी

साहित्य

 दोन मोठे आलूचे चीप सारखे काप, लाल तिखट, चवीनुसार मीठ, जिरे कूट, वाटून घेतलेला लसूण, चिमूटभर सोडा, बारीक चिरलेली कोथिंबीर, डाळीचे पीठ, आणि हळद.

आलूचे चिप्स सारखे काप करून घेऊयात. एका बोलमध्ये थोडेसे डाळीचे पीठ घेऊन या त्यात लाल तिखट चवीनुसार मीठ ओवा टाकून ते सगळे एकत्र करून घेऊयात नंतर थोडेसे त्यात पाणी टाकून त्याला पातळ करून घेऊयात यानंतर आपण भजी तळताना आलूचे काप केलेले एकेक त्या मिश्रणात बुडवून आपण तेलामध्ये टाकून घेऊयात जसे की आपण मिरची भजे करतात तर तयार आहेत आपले आलूचे भजी. आलू ची भाजी आपण रेड सॉस सोबत खाऊ शकतो एकदम स्वादिष्ट लागेल व सगळ्यांनाच आवडेल.

3. पालक भजे रेसिपी

साहित्य

बारीक चिरलेली पालक, लाल तिखट, चवीनुसार मीठ, जिरे कूट, वाटून घेतलेला लसूण, चिमूटभर सोडा, बारीक चिरलेली कोथिंबीर, डाळीचे पीठ, आणि हळद.

पालक भजी बनवताना सर्वात आधी आपण पालक दोन घेऊन त्याला एकदम बारीक बारीक चिरून घेऊयात. एका बॉल मध्ये डाळीचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ लाल तिखट लसूण वाटून आणि जिरे टाकून घेऊयात त्यानंतर आपण बारीक चिरलेली पालक त्यात टाकूयात व सगळे एकत्र मिश्रण करून घेऊयात नंतर थोडी  बारीक चिरलेली कोथिंबीर आपण त्यात टाकून घेऊयात नंतर लागेल त्याप्रमाणे आपण थोडं थोडं पाणी टाकून ते मिश्रण थोडेसे पातळ करून घेऊयात. नंतर आपण त्यात थोडेसे सोडा टाकून घेऊयात जेणेकरून भजी थोडीशी क्रिस्पी होईल. आपण आता भजी तळण्यासाठी सुरुवात करूयात गॅसवर कडे ठेवून त्यात तेल टाकून गरम होईपर्यंत वाट बघुयात गरम तेल झाल्यास त्यात आपण भजी टाकूया ती चांगली एकदम खुसखुशीत व ब्राऊन कलर आल्यास त्याला बाहेर चाळणीने काढून घेऊन एका प्लेटमध्ये टिशू पेपरवर टाकूयात. तर तयार आहे आपली पालक भजी. ही भजी तुम्ही लाल चटणी सॉस सोबत खाऊ शकता एकदम टेस्टी आणि क्रिस्पी लागेल लगेच करून पहा आणि सगळ्यांना द्या नक्की आवडेल.

4. मिरची भजे रेसिपी

साहित्य

 दहा-बारा नकलून घेतलेल्या मिरच्या, लाल तिखट, चवीनुसार मीठ, जिरे कूट, वाटून घेतलेला लसूण, चिमूटभर सोडा, बारीक चिरलेली कोथिंबीर, डाळीचे पीठ, आणि हळद.

मिरची भजी बनवताना आपण लांब करायचा घेऊन त्यात त्याला थोडा कट करून घेऊया व त्यात थोडीशी मीठ भरून घेऊयात नंतर एका बाऊलमध्ये आपण एक वाटी डाळीचे पीठ घेऊयात त्यात लाल तिखट चवीनुसार मीठ लसूण पेस्ट आणि जिरे वाटून टाकुयात वरून थोडासा ओवा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ते सगळे मिश्रण एकत्र करून घेऊयात नंतर थोडे थोडे पाणी टाकून त्याला थोडेसे पातळ करून घेऊयात नंतर आपण कट केलेले भजी त्यात एकेक टाकून आपण तळायला घेऊयात तर भजी तळण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवून त्यात थोडेसे तेल टाकूयात तेल गरम झाल्यास आपण एक एक भजी त्या मिश्रणात बुडवून त्याला टाकूया व थोडासा ब्राऊन कलर आला असती आपण काढून घेऊयात तर तयार आहे आपली मिरची भाजी मिरची भाजी सगळ्यांनाच आवडते तर तुम्ही नक्की करून पहा मिरची भजी तुम्ही चहा सोबत सुद्धा खाऊ शकता.

FAQ

पकोडे कोणत्या गोष्टी पासून क्रिस्पी बनवतात?

पकोडे बनवताना आपण बेसन पीठ टाकल्यास त्यासोबत थोडेसे तांदळाचे पीठ मिक्स केल्यास पकोडे थोडेसे क्रिस्पी बनतात.

पकोडे बनवताना त्यात कोणता सोडा टाकला जातो?

पकोडे चांगले फुगण्यासाठी आपण एक सोडा टाकतो तो म्हणजे बेकिंग सोडा.

पकोडे जास्त वेळ कुरकुरीत कसे ठेवू शकतो?

पकोड्याचा मिश्रण करताना आपण त्यात थंड पाणी टाकल्यास मिश्रण थंड असल्यास जास्त वेळ कुरकुरीत राहतात आणि ते जास्त तेल पण नाहीत सोडत एकदम हलके आणि क्रिस्पी होतात.

पकोडे किती वेळ तळायला पाहिजेत?

पकोडे दोन-तीन मिनिट त्याला चांगला सोनेरी कलर येईल तोपर्यंत तळायला पाहिजे त्याला चांगला सोनेरी कलर आला की एकदम क्रिस्पी होईल.

Leave a Comment