OBC Scholarship 2024 विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी ९ मार्च २०१७ रोजीच्या अधिसूचनेन्वये ‘इतर मागास बहुजन कल्याण’ या स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या विभागामार्फत विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येतात.
आर्थिक अडचणीमुळे परराज्यात व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी इच्छुक व्हीजेएनटी, एसबीसी, ओबीसी आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती सुरू करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.
भारत सरकारच्या डॉ. आंबेडकर मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती (डी.एन.टी.) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती (केंद्र ७५% व राज्य हिस्सा २५%) योजना
योजनेचे स्वरूप:
केंद्र शासनाची ही योजना आहे. विजाभजमधील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना प्रतिमहा रु. १००/- प्रमाणे १० महिन्यांसाठी रु. १,०००/-शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच नववी ते दहावीमधील विद्यार्थ्यांना प्रतिमहा रु. १५०/- प्रमाणे १० महिन्यांसाठी रु. १,५००/-शिष्यवृत्ती दिली जाते.
संपर्क:
या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, समाज कल्याण अधिकारी वर्ग-२, बृहन्मुंबई, संबंधित विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा.
भारत सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना
योजनेचे स्वरूप:
केंद्र शासनाची योजना असून यामध्ये केंद्र ७५ टक्के व राज्याचा २५ टक्के हिस्सा असतो. वसतिगृहात राहणारे तसेच न राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दहा महिन्यांकरिता ही योजना अनुज्ञेय असेल. गट-१ मधील अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १,२०० रुपये, तर वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ५५० रुपये, गट-२ मधील अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ८२० रुपये, तर वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५३० रुपये, गट-३ मधील अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५७० रुपये, तर वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३,००० रुपये, गट-४ मधील अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३८० रुपये, तर वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यासाठी २३० रुपये दिले जातात.
संपर्क:
या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी वर्ग-२, बृहन्मुंबई, संबंधित विद्यालयाचे प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा.
भारत सरकारची इतर मागास प्रवर्गासाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना
योजनेचे स्वरूप:
या योजनेत केंद्र ५० टक्के, तर राज्याचा ५० टक्के हिस्सा असतो. ही दरमहा शिष्यवृत्ती १० महिन्यांकरिता देण्यात येते. अनिवासी इयत्ता पहिली ते दहावीसाठी रुपये १०० तसेच निवासी इयत्ता तिसरी ते दहावीसाठी रुपये ५०० देण्यात येतात. अनिवासी इयत्ता पहिली ते दहावीसाठी रुपये ५०० तसेच निवासी इयत्ता तिसरी ते दहावीसाठी रुपये ५०० देण्यात येतात.
संपर्क:
या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी वर्ग-२, बृहन्मुंबई, संबंधित विद्यालयाचे प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत इयत्ता पाचवी आणि सातवीमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना
योजनेचे स्वरूप:
या योजनेत इयत्ता पाचवी ते सातवीमधील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींना प्रतिमहा रुपये २५०/- प्रमाणे १० महिन्यांसाठी रुपये २५००/- शिष्यवृत्ती देण्यात येते.
संपर्क:
योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, समाज कल्याण अधिकारी वर्ग-२, बृहन्मुंबई, संबंधित विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्यांशी संपर्क साधावा.
इ.मा.व. मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
योजनेचे स्वरूप:
या योजनेत इयत्ता आठवी ते दहावीमधील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींना प्रतिमहा रुपये ३००/- प्रमाणे १० महिन्यांसाठी रुपये ३,०००/- शिष्यवृत्ती देण्यात येते.
संपर्क:
संबंधित जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, समाज कल्याण अधिकारी वर्ग-२, बृहन्मुंबई, संबंधित विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क (मॅट्रिकपूर्व) प्रदान करणे विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना
योजनेचे स्वरूप:
या योजनेंतर्गतसंबंधित शाळांना जे शुल्क अनुज्ञेय आहे, ते प्रवेश शुल्क, वाचनालय, क्रीडा, प्रयोगशाळा अशा स्वरूपाचे शुल्क संबंधित शाळांना परस्पर अदा केले जाते. तसेच एक वेळ नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते.
संपर्क :
या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, समाज कल्याण अधिकारी वर्ग-२, बृहन्मुंबई, संबंधित विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा
विजाभज व विमाप्र प्रवर्गातील इयत्ता पाचवी आणि सातवीमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना
योजनेचे स्वरूप :
या योजनेत इयत्ता पाचवी ते सातवीमधील विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थिनींना प्रतिमहा रुपये ६०/- प्रमाणे १० महिन्यांसाठी रुपये ६००/- शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेच्या शिष्यवृत्तीचे दर कमी असल्याने शिष्यवृत्तीच्या दरामध्ये वाढ करण्याचा राज्य सरकारचा विचार असून त्याबाबत कार्यवाही सुरू आहे.
संपर्क :
योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, समाज कल्याण अधिकारी वर्ग-२, बृहन्मुंबई, संबंधित विद्यालयाचे मुख्याध्यापक.
विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना
योजनेचे स्वरूप :
या योजनेत इयत्ता पाचवी ते सातवीसाठी दरमहा रु. २० रुपये प्रमाणे १० महिन्यांकरिता रु. २०० रुपये प्रति विद्यार्थी व इयत्ता आठवी ते दहावीसाठी दरमहा रु. ४० रुपयांप्रमाणे १० महिन्यांकरिता रु. ४०० रुपये प्रतिविद्यार्थी शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेच्या शिष्यवृत्तीचे दर कमी असल्याने या शिष्यवृत्तीच्या दरामध्ये वाढ करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.
संपर्क :
योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, समाज कल्याण अधिकारी वर्ग-२, बृहन्मुंबई, संबंधित विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्यांशी संपर्क करावा.
विजाभज व विमाप्र प्रवर्गातील इयत्ता पाचवी आणि सातवीमध्ये शिकणाऱ्या, सैनिक शाळेत शिकणाऱ्या मुलींसाठी, विजाभज, विमाप्र मुलींसाठी निर्वाह भत्ता योजना
योजनेचे स्वरूप :
या योजनेत राज्यातील शासन मान्य सैनिक शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विजाभज / विमाप्र प्रतिविद्यार्थ्यांना रु. १५,००० रुपयांप्रमाणे निर्वाहभत्ता देण्यात येतो.
संपर्क :
योजनेच्या अधिक माहितीकरिता संबधित जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद व संबंधित विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा.
स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार योजना
योजनेचे स्वरूप :राज्यातून व विभागातून माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या इयत्ता १०वी व १२ वीच्या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विमुक्त जाती / भटक्या जमाती प्रवर्गातून इतर मागास प्रवर्गातील सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीला प्रत्येकी रुपये १ लाख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येते.
विभागातून माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या इयत्ता १०वी व १२ वी परीक्षेत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातून सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीला प्रत्येकी रु. ५१ हजार रुपये,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येते.
संपर्क :अधिक माहितीकरिता संचालक,इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यांशी संपर्क साधावा. वरील सर्व योजनांच्या सविस्तर माहितीसाठी obcbahujankalyan.maharashtra.gov.in संपर्क साधावा.
Conclusion
आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षणा आवश्यक असते परंतु आर्थिक अडचणीमुळे शिक्षण थांबू नये किंवा त्या मुलास कुठेही अडचणी येऊ नये यासाठी शासनामार्फत ज्या ओबीसी समाजासाठी शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात त्या सविस्तर आपण वर पाहिले आहेत तर तर या योजनेचा लाभ घेऊन आपण आपल्या मुलांचे भविष्य अधिक उज्वल करू शकतो त्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. तर आपण वरील शिष्यवृत्ती योजना सविस्तर पाहून आपल्या मुलांचे शिक्षण कुठल्या वर्गात चालू आहे त्याप्रमाणे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करू शकता व विविध शिष्यवृत्ती योजना चा लाभ घेऊ शकता त्यामुळे आपल्याला येणाऱ्या शिक्षणातील अडचणी दूर होतील व विद्यार्थ्यांची अधिक सोय केली यामध्ये आपण फीस मध्ये सवलत यापासून ते वस्तीगृहात राहण्याच्या योजना तसेच मोफत ऍडमिशन या सर्व योजना दिलेल्या आहेत प्रामुख्याने यात मुलींसाठी विविध योजना आहेत त्याचा पण आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे, त्या योजनांचा लाभ घेऊन आपण आपल्या मुलींना उच्च शिक्षण देऊ शकतो यासाठी लागणारे संपर्क व्यवस्था ही आपण सविस्तर सांगितलेले आहे त्याप्रमाणे आपण संपर्क साधून आपल्या हक्काची शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकता अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट मध्ये कळवू शकता.
1 thought on “OBC Scholarship 2024:ओबीसी शिष्यवृत्ती योजना.”