झणझणीत मटन रस्सा रेसिपी Mutton Rassa Recipe In Marathi

भारतामध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये Non-Veg खाण्याचे प्रमाण वाढले आहे. Non-veg खाणाऱ्यांची संख्या ही  खूप ज्यास्त  प्रमानात आहे .बहुतांश लोक खूप आवडीने Non-Veg खातात आणि त्यामध्ये मटण म्हणलं की झणझणीत खायला आवडत. आपण जाणून घेऊया झणझणीत मटन रस्सा रेसिपी कशी बनवायची. मटन बनवण्याचा खूप साऱ्या पद्धती आहे ,जागा बदलली की पद्धती सुद्धा बदलल्या जातात आणि बनवण्याचा पद्धतीनुसार मटणाची चव सुद्धा बदलते, परंतु मटणाची भाजी रस्सेदार आणि झणझणीत खायला  आवडते आणि मटन झणझणी नसेल तर त्याला एवढी चव सुद्धा येत नाही .त्यामुळे भाकरी झणझणीत मटन रस्सा आणि सोबत कांदा खायला बहुतांश लोकांना खूप आवडते. चला तर मग जाणून घेऊया झणझणीत मटन रस्सा रेसिपी

झणझणीत मटन भाजी रेसिपी मराठीमध्ये खालील प्रमाणे

मटन रस्सा भाजीसाठी लागणारी सामग्री Ingredients of Mutton

  • अर्धा किलो मटण(मध्यम आकाराच्या मटन तुकडे)
  • ५ ते ६ कांदे(बारीक चिरलेले)
  • अर्धा वाटी लसन पाकळया(सोलून)
  • एक मोठा तुकडा अद्रक(बारीक कट करून)
  • ७ ते ८ काळी मिरी
  • ३,४ विलायची
  • ५,६ लवंग
  • एक चमचा खसखस
  • चवीनुसार मीठ
  • दोन चमचे लाल तिखट
  • दोन चमचे हळद
  • दोन चमचे धना पावडर
  • २,४‌ तेजपाता
  • दालचीनी
  • खोबरं(बारीक चिरून)
  • आवश्यकतेनुसार तेल
  • कोथिंबीर
  • पाणी आवश्यकतेनुसार

मटन बनविण्यासाठी लागणारा कालावधी

मटन बनवण्यासाठी मसाले तयार करून घेण्यासाठी कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट लागतात.

मटन शिजु घातल्यानंतर शिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागतात .अशा प्रकारे झणझणीत मटन रस्सा भाजी ही कमीत कमी 40 ते 45 मिनिटांमध्ये तयार होते.

मटन भाजी बनवण्यासाठी चा विधी How to make matan rassa recipe

मटन भाजी ही दोन प्रकारे बनवले जाते एक म्हणजे झणझणीत रस्सा भाजी आणि दुसरी म्हणजे सुखी मटन भाजी. तर आपण झणझणीत रस्सा भाजी कशी बनवायची याचा विधी पाहूया.

Step 1:-

सर्वप्रथम मटण रस्सा भाजी बनवण्यासाठी बाजारातून विकत आणलेले मटण हे स्वच्छ पाण्याने ,स्वच्छ धुऊन घ्यावे, त्याचे तुकडे हे मोठे असतील तर मध्यम आकारात कापून घ्यावे आणि परत धुवून घ्यावे.

Step 2:-

 मटन धुऊन घेतल्यानंतर त्यावरती दोन चमचे हळद आणि चवीनुसार मीठ आणि लसूण अद्रक पेस्ट दोन चमचे लावून मटणाच्या प्रत्येक तुकड्याला बरोबर लावून घ्यावी. मटणाला मॅरीनेट करून थोड्या वेळासाठी शांत  ठेवावे.

    तुमच्याकडे घरी अद्रक लसूण पेस्ट असेल तर ती वापरावी नाहीतर अद्रक लसूण पेस्ट बनवणे हे खूप सोपे आहे. यासाठी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या सोलून व एक मोठा अद्रक चा तुकडा मिक्सरमधून बारीक करून घ्यावा.

Step 3:-

 मटनाची  झणझणीत रस्सा भाजी तर सर्वांनाच आवडते परंतु मटणाचा पिवळा रस्सा हे देखील सर्वांना आवडतो .तर आपण या रेसिपीमध्ये मटणाचा पिवळा रस्सा कसा बनवायचा हे देखील जाणून घेऊया.

 सर्वप्रथम कढई ,पातेल किंवा कुकर ज्यामध्ये तुम्हाला मटन बनवायच आहे. ते गॅसवर मध्यम फ्लेमवर ठेवावे. पिवळा रस्सा बनवण्यासाठी कुकरमध्ये थोडेच तेल टाकावे. तेलामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकावा हा मस्त लाल होईपर्यंत परतून घ्यावा, त्यानंतर एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट व बारीक कुटून घेतलेले खोबरे घालावे याच्यानंतर मॅरीनेट केलेले मटन कुकरमध्ये टाकावे .त्यासोबतच एक ते दोन तेज पत्ता सुद्धा यामध्ये घालावा, तेजपत्त्यामुळे मटणाला व पिवळा रस्याला एक वेगळीच टेस्ट व सुगंध येतो.

Step 4:-

 जर तुम्ही मटण हे पातेल्यामध्ये बनवत असाल तर त्यावरती ताट झाकून ताटेवरती पाणी ठेवून मधून मधून थोडं थोडं पाणी त्यामध्ये घालावे, यामध्ये मटण शिजण्यासाठी थोडा वेळ लागेल. आणि या व्यतिरिक्त जर तुम्ही मटण कुकरमध्ये झटपट बनवणार असाल तर तेलामध्ये मॅरीनेट केलेले मटण टाकल्यानंतर थोडा वेळ ते मटण परतून घ्यावे व त्याच्यामध्ये एक ते दोन ग्लास पाणी टाकून कुकरचे झाकन  लावून घ्यावे. मटणाला शिजायला थोडा वेळ लागतो ,त्यामुळे कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या घ्याव्या. नंतर कुकरचे झाकण उघडून बघावे अशाप्रकारे आळणी म्हणजेच पिवळा रस्सा तयार झालेला असेल. हा तुम्ही जेवण बनेपर्यंत म्हणजेच मटन तयार होईपर्यंत सूप म्हणून सुद्धा, स्टार्टर म्हणून सुद्धा घेऊ शकता पिवळ्या रसाचे खूप फायदे आहेत तर मटणाची भाजी तर सगळ्यांनाच आवडते पण मटणाचा पिवळा रस्सा देखील पिलेले शरीरासाठी खूप चांगले असते ,तर आवर्जून भाजी बनवताना पिवळा रस्सा बनवत जा.

Step 5:- 

मटन शिजल कुकरमध्ये घातल्यानंतर जो वेळ भेटतो त्या वेळेमध्ये आपण मटणाचा घरगुती पद्धतीने काळा मसाला करून घेऊया. प्रत्येकाच्या घरी हे काळ तिखट असतात परंतु मटणासाठी स्पेशल काळा मसाला हे देखील आपण या रेसिपी मध्ये बघूया. वरील सामग्री मध्ये लिहिलेले मसाले जसे की कांदा, लसूण ,अद्रक, काळी मिरी ,लवंग विलायची, वेलदोडे ,तेज पत्ता यापासून आपण काळा मसाला तयार करून घेऊया.

काळा मसाला तयार करण्यासाठी ची विधी How to make matan rassa recipe

Step 6:-

  तवा गॅस वरती मिडीयम फ्लेम वरती ठेवावा त्यामध्ये खसखस, विलायची, काळी मिरी ,लवंग ,वेलदोडे, तेच पत्ता, खोबरं, दालचिनी ही मध्यम फ्लेम वरती आरामात भाजून घ्यावी. या मसाल्याला जास्त लाल होईपर्यंत भाजू नये किंवा कमीही भाजू नये मसाल्यामधून भाजते वेळेस थोडा थोडा वास त्या मसाल्याचा सुगंध जेव्हा येत असेल तेव्हाच गॅस बंद करून घ्यावा. त्याचबरोबर भाजले ला मसाला साईडला काडून ढंड करून घ्यावा. त्याचबरोबर साईडला गॅस वरती पूर्ण कांदा हा भाजून घ्यावा .सोबतच खोबरेत सुद्धा गॅस वरती ठेवून भाजून घ्यावे असे थोडासा लालसर असा कलर आला पाहिजे.

जो खडा मसाला आपण तव्यावरती भाजून घेतला आहे ,त्याला थोडं थंड करून मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यावे .याचबरोबर साईडला खोबरे भाजलेले बारीक करून घ्यावे. खोबरे आणि खडा मसाला हा मिक्सरमध्ये एकत्र बारीक करू नये हा वेगवेगळा मिक्सरमधून बारीक करून घ्यावा व त्यानंतर कांदा जो भाजलेला आहे त्याच्या वरचा पाचोळा काढून भाजलेला कांदा मिक्सरमधून बारीक करून घ्यावा याचबरोबर आपला काळा मसाला तयार झाला असेल ,जो भाजलेला खडा मसाल्याचा काळा मसाला तयार केला आहे त्याचा सुगंध व चव ही मटणाची चव वाढवतात.

मटणाची भाजी म्हटलं तर थोडा वेळ तर लागणारच त्यामुळे झणझणीत मटणाची रस्सा भाजी करताना सर्व स्टेप हळुवारपणे कराव्यात यामुळे मटणाला चांगली चव येईल. चला तर मग भाजीला शेवटचा तडका म्हणजेच फुणि देऊन घेऊया.

Step 7:-

 गॅस वरती मोठं पातेलं ठेवून त्यामध्ये रोजच्यापेक्षा थोडं जास्त तेल घालावे , तेल थोडं गरम झालं असताच भाजलेला कांदा जो मिक्सरमधून काढून घेतलेला आहे तो घालावा ,कांदा हा तेलामध्ये कमीत कमी दहा ते बारा मिनिट चांगला परतून घ्यावा जेणेकरून कांद्यामधून पाणी संपून तेल बाहेर आलं पाहिजे जेव्हा कांदा चांगला परतून घेतला जाईल तेव्हाच मटणाला चव येते .

मटणाच्या भाजीचा बेस हा कांद्याचा ग्रेव्ही वरती असतो आपण कांद्याचा वापर मटणाच्या भाजीमध्ये कसा करतो यावरती मटणाच्या भाजीची चव ठरली जाते. त्यामुळे या वेळेस थोडी घाई न करता कांद्याला दहा-पंधरा मिनिट कमी फ्लेम वरती चांगला परतून घ्या यानंतर जेव्हा कांद्यातल तेल साईडला आणि कांदा साईडला होईल, त्यावेळेस आपण मिक्सरमधून काढलेला काळा मसाला अद्रक लसूण पेस्ट व खोबरे घालून पाच ते सात मिनिट परत परतून घ्यावे. जेणेकरून मसाले हे चांगल्या प्रकारे कांद्यामध्ये व तेलामध्ये शिजली गेली पाहिजे हे मसाले कांद्यासोबत मिक्स होऊन एक वेगळंच फ्लेवर सोडतील जेव्हा त्यामधून हा वेगळा सुगंध येईल त्यानंतर जे आपण उकडलेले मटण चे तुकडे आहेत ते त्या ग्रेव्हीमध्ये घालून परतून घ्यावे .

हे सुद्धा कमीत कमी दहा मिनिट परतावे यानंतरच जो आपण पिवळा रस्सा बनवलेला आहे त्यावरच जी तरी आहे ही यामध्ये घालावे, हे असे का बर कारण जेव्हा आपण मटण हे मसाला मध्ये न शिजवता पिवळा रस्सा बनवतात तेव्हा मटणाची काही प्रमाणात चव ही पिवळा रस्सा मध्ये गेलेली असते म्हणून तर उकडलेले मटणाचे तुकडे फक्त रस्सा भाजी मध्ये टाकले तर त्यामध्ये एवढीच फ्लेवर नाही उतरणार यामुळेच पिवळ्या रस्यावरची जी तरी आहे की ह्या मसाल्यामध्ये टाकावी जेणेकरून तरी ही मटणाचा तुकड्यांमध्ये गेली पाहिजे हा मसाला थोडा वेळ शिजल्यानंतर मटणाच्या तुकड्याला सुद्धा मसाला लागेल हे मिक्सर चांगले परतून घ्यावे यानंतर थोडं पाणी घालून चवीनुसार मीठ तिखट घालून उकळेपर्यंत कमी फ्लेम वरती गॅस वरती ठेवावे.

 सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात गरजेचं म्हणजे बारीक कट केलेली कोथिंबीर त्यावरती टाकावे जेणेकरून मटणाच्या चवीला अजून उजाळा बसेल अशाप्रकारे आपले झणझणीत मटण रस्सा भाजी तयार झालेली असेल .

तुमचे झणझणीत मसालेदार मटन रस्सा भाजी तयार झाली.

FAQs

मटणाची रस्सा भाजी कशा सोबत खातात ?

तुम्ही ज्वारीच्या भाकरी सोबत ,तांदळाच्या भाकरी सोबत ,बाजरीच्या भाकरी सोबत किंवा चपाती ,नान सोबत खाऊ शकता यासोबत जर तुम्ही  तांदुळाचा भात मऊ शिजलेला चिकट आणि मटणाचा रस्सा सोबत खाऊ शकता याची चव ही वेगळीच असते. परंतु झणझणीत मटणाचा काळा रस्सा हा सर्वात जास्त भाकरी सोबतच खाल्ला जातो व तो भाकरी सोबत खूप चविष्ट लागतो.

मटन रस्सा भाजी कशी तयार करायची ?
How to make muttan rassa recipe ?

झणझणीत मटन रस्सा भाजी कशी तयार करायची हे बरे दिलेल्या आर्टिकल मध्ये सविस्तरपणे सांगितला आहे तर तुम्ही हे नक्की वाचा त्यांनी तुम्हाला समजेल मटन रस्सा भाजी कशी तयार करायची तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.

मटन रस्सा भाजी ही आरोग्यासाठी उत्तम आहे का ?
is mutton is good for health ?

मटन रस्सा भाजी हे आरोग्यासाठी उत्तम आहे. मटन असो की चिकन हे आरोग्यासाठी उत्तम आहे कारण मटन मध्ये प्रथिने आणि लोह याचे प्रमाण जास्त असते ,व कॅलरीज आणि चरबी कोलेस्ट्रॉल याचे प्रमाण कमी असते. यामुळे शरीराला फायदा होतो. त्यामुळे चिकन आणि मटण दोन्ही आरोग्यासाठी उपयुक्त आहे.


भारतामध्ये प्रसिद्ध बिहारी मटन डिश कोणती आहे ?
Which is the famous Bihari mutton dish ?

भारतातील प्रसिद्ध बिहारी डिश ही चंपारण मास आहे .ज्याला अमुना किंवा हंडीचे मास किंवा बाटलोही म्हणूनही ओळखले जाते .हे डिश बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यात तयार केली जाते .ही डिश बनवत असताना मोहरीचे तेल आणि तुपाचा वापर केला जातो. यामध्ये लसूण, कांदा ,ओले मसाल्याच्या पेस्ट सह मटन मॅरीनेट केले जाते. व ते मातीच्या हंडीत म्हणजेच हंडीमध्ये शिजवले जाते. व त्याचे झाकण मळलेल्या कणकी पासून बंद केले जाते. अशा प्रकारे हे मटन बनवले जाते.

भारतामधील सर्वोत्तम मटन डिश कोणते आहेत?
What is the best mutton dish in India?

कोशा मंगेशो-पश्चिम बंगाल
काश्मिरी रोगन जोश -काश्मीर
गंगुराम मटन आंध्र प्रदेश
चिट्ठी नाड -मटन तमिळनाडू
खट्टा मास- जम्मू
सल्ली बोटी -महाराष्ट्र
साग – हरियाणा
मटन रारा -हिमाचल प्रदेश

मटन शिजण्यासाठी कुकरच्या किती शिट्ट्या वाजल्या पाहिजेत ?
How many cooker whistles for mutton ?

प्रत्येक घरी कुकर हे वेगवेगळे असतात परंतु चिकन तेलामध्ये चांगले परत दिल्यानंतर गॅसच्या हाय फ्लेमवर एक शिट्टी व गॅसच्या कमी फ्लेम वरती तीन ते चार शिट्ट्या घेतल्यानंतर मटन हे मऊ शिजले जाईल.

Leave a Comment