Kokan Style Malvani Chicken Recipe In Marathi कोकण पद्धतीने मालवणी चिकन रस्सा रेसिपी

Nonveg जेवण हे बहुतांश लोक खूप आवडीने खातात आणि खूप आवडीने बनवतात सुद्धा. नॉनव्हेज मध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. वेगवेगळ्या भागांमध्ये नॉनव्हेज हे वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ले जाते. मालवणी चिकन रस्सा हे कोकण भागांमध्ये खूप प्रसिद्ध आहे मालवणी चिकन रस्सा हे मोस्टली उन्हाळ्यामध्ये खाल्ले जाते ,कारण कोकण भागामध्ये नारळ उत्पादन जास्त असते व या चिकन रस्सा मध्ये  ओल्या नारळाचा उपयोग जास्त केला आहे .जेणेकरून मसाला पदार्थ कमी लागतो व नारळ थंड असतात यांनी गर्मी कमी होते.

        त्यामुळे कोकणामध्ये मालवणी चिकन खूप प्रमाणात खाल्ले जाते. कोकणाचे वैशिष्ट्य मालवणी चिकन रस्सा हे कोकणातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये खूप आवडीने खाल्ले जाते चला तर मग जाणून घेऊया कोकणी पारंपारिक पद्धतीने मालवनी चिकन रस्सा रेसिपी कशी बनवायची.

मालवणी चिकन रस्सा साठी लागणारी सामग्री

Ingredients of malvani chicken

  • अर्धा किलो चिकन तुकडे मध्यम आकाराचे चिकन तुकडे
  • दहा ते पंधरा लसूण पाकळ्या सोलून
  • एक मोठा तुकडा अद्रक बारीक कट करून
  • तीन ते चार हिरव्या मिरच्यां
  • दोन ते तीन चमचे लाल मिरची पावडर
  • एक ते दोन चमचे हळदी पावडर
  • कोथिंबीर बारीक कट करून
  • दोन चमचे धना पावडर
  • ४ चमचे मालवणी मसाला
  • दोन ते तीन मिडीयम आकाराचे कांदे कट करून
  • अर्ध ओला नारळ बारीक किसून
  • मीठ चवीनुसार
  • तेल आवश्यकतेनुसार
  • पाणी आवश्यकतेनुसार

मॅरीनेट करण्यासाठी लागणारा मालवणी मसाला थोड्याच वेळात कसा बनवायचा याची कृती खालील प्रमाणे

मालवणी मसाला सामग्री

Ingredients of malvani masala

  • तीन ते चार चमचे धन
  • अर्धा चमचा मेथी दाना
  • ७,८ काळी मिरी
  • ७,८ लवंग
  • २,४ त्रिफला
  • १ चमचा जिरा
  • १ चमचा बडीसोप
  • १  चमचा शहाजिरा
  • ४,५ विलायची
  • ४,५ मोठी विलायची
  • ४,५ चक्रीफुल
  • ३,४ जावित्री के तुकडे
  • दोन मोठे चमचे दगडी फुल
  • २ इंच दालचिनी
  • २,३ तेज पत्ता
  • २ चमचे मोहरी
  • एक चमचा खसखस
  • छोटा तुकडा जायफळ
  • १० ,१५ लाल मिरची
  • १० ,१५ काश्मिरी लाल मिरची

मालवणी मसाला बनवण्यासाठी कृती

How to make malvani chickan masala

Step 1:-सर्वप्रथम कढाई मध्ये चार ते पाच चमचे अख्खा धना व अर्धा चमचा मेथी दाना टाकून कमी फ्लेम वरती छान भाजून घ्यावे.  नंतर ते एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यावे, याच कढाई मध्ये सात ते आठ काळीमिरी, सात ते आठ लवंग, दोन, चार त्रिफळाचे तुकडे घालून कमी फ्लेम वरती सुगंध येईपर्यंत परतून घ्यावे. हे भाजून झाल्यानंतर याला एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यावे .

यानंतर एक चमचा जिरा ,एक चमचा बडीसोप, एक चमचा शहाजीरा एकदम कमी फ्लेम वरती मसाल्याचा वास येईपर्यंत भाजून घ्यावेत,  त्याबरोबरच हे मसाले थंड करण्यासाठी काढून घ्यावे.

कढाई मध्ये तीन ते चार विलायची, दोन ते चार मोठी विलायची ,तीन ते चार जावित्रीचे तुकडे, दोन ते तीन चक्रीफुल, दोन ते तीन तेज पत्ता, दोन इंच दालचिनी, दोन चमचे दगडी फुल टाकून कमी फ्लेम वरती हे सर्व मसाले भाजून घ्यावेत या मसाल्यांना जास्त बाजूने. मसाले थंड करण्यासाठी कढईतून साईडला काढून घ्यावे.

यानंतर कढईमध्ये दोन चमचे मोहरी घालून भाजून घ्यावे, त्यानंतर दोन चमचे खसखस व छोटा तुकडा जायफळ घालून छान भाजून घ्यावे ,यानंतर रेगुलर लाल मिरची दहा ते पंधरा कढईमध्ये घालून कमी फ्लेम वरती भाजून घ्यावी , थंड करण्यासाठी साईडला काढून घ्यावी.

त्यानंतरच मसाल्याला कलर येण्यासाठी पंधरा ते वीस काश्मिरी लाल मिरची ही कढईमध्ये कमी फ्लेम वरती भाजून घ्यावी ,ही मिरची जास्त काळी होईपर्यंत भाजू नये आपल्याला मसाल्याला कलर असा लालसर दिसला पाहिजे त्यामुळे ही मिरची कमी फ्लेम वरती कडक होईल इतकीच भाजावी.

Step 2:–वरती जेवढे मसाले आपण भाजून घेतले आहेत ,आता ते थंड झाले असतील ते सर्व मसाले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यावेत आणि ते चाळणीने चाळून घ्यावे जेणेकरून आपल्याला मसाल्याची पावडर मिळेल, जर त्यात काही मोठे मसाला राहिला असेल तर तो चाळणीतून खाली येणार नाही  , काढून घेतलेल्या मसाल्यामध्ये  एक अर्धा चमचा हळद व एक चमचा मीठ घालून मिक्स करून घ्यावे अशा पद्धतीने आपला मालवणी मसाला तयार होईल मालवणी मसाला हा मालवणी चिकन मटण या रेसिपी मध्ये टाकला जातो. मालवणी मसाल्यामुळे चिकनच्या चवीमध्ये अजून वाढ होते.

मालवणी चिकन रस्सा बनवण्यासाठी लागणारा कालावधी

मालवणी चिकन रस्सा बनविण्यासाठी कमी कालावधी लागतो ,कारण आपण चिकन हे तेलामध्येच आणि मसाला मध्ये शिजवून घेतो त्यामुळे कमीत कमी 30 ते 40 मिनिटांमध्ये आपलं मालवणी चिकन रस्सा तयार होईल चला तर मग पाहूया मालवणी चिकन रस्साची विधी.

मालवणी चिकन रस्सा कोकण पद्धतीने बनवण्यासाठी लागणारी कृती खालील प्रमाणेHow to make malvani chickan rassa

Step 1:-सर्वप्रथम बाजारातून विकत आणलेले chikan स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावेत, जर ते तुकडे मोठे असतील तर चिकनचे मिडीयम साईज चे तुकडे करून घ्यावे, आपल्या सोयीनुसार ,बारीक पाहिजे असतील तर बारीक करून घ्यावे व परत चिकनला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे.

यानंतर चिकनच्या पीस ला मसाला लावून मॅरीनेट करून ठेवावे चिकन मॅरीनेट करण्यासाठी कोणते मसाले वापरावे हे खालील प्रमाणे:-

     Step 2:- चिकन मॅरीनेट करण्यासाठी सर्वप्रथम धुऊन घेतलेल्या चिकनच्या तुकड्यावरती एक चमचा मीठ, एक चमचा लसूण पेस्ट ,एक चमचा अद्रक पेस्ट टाकावी. यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर ,तीन-चार लसणाच्या पाकळ्या, एक छोटा अद्रक चा तुकडा टाकून बारीक करून घ्यावे ,व मिक्सर मधून केलेले मिश्रण चिकनला  चांगल्या पद्धतीने लावून घ्यावे.

 यासोबतच चिकन वरती मालवणी मसाला दोन चमचे टाकून चिकनच्या प्रत्येक तुकड्याला तो मसाला लागला जाईल अशा प्रकारे मिक्स करून थोड्या वेळासाठी ठेवून द्यावे. मालवणी चिकन रस्सा म्हटलं की स्पेशल मालवणी मसाला लागतोच त्याशिवाय मालवणी चिकन रस्साला चव कशी येईल. मालवणी मसाल्याची चव ही वेगळीच असते मालवणी मसाल्यामुळेच मालवणी चिकन रस्याला एक वेगळीच चव येते. हे मॅरीनेट केलेले चिकन थोडा वेळासाठी रेसला ठेवावे.

Step 2:- मालवणी रस्सा भाजी बनवण्यासाठी फुणीची तयारी करून घेऊया , मालवणी चिकन रेसिपी सर्वप्रथम कांदा खोबऱ्याचा मसाला तयार करून घ्यावा, मालवणी चिकन मध्ये कांदा हा थोडा कमी व खोबरे थोडे जास्त वापरले जातात ,यासाठी आपण दोन मिडीयम साईजचे कांदे लांब काप करून घ्यावेत व अर्ध खोबरं अर्धा किलो चिकन साठी किसून घ्यावे, जेणेकरून ते लवकर भाजले जाईल यासाठी गॅस वरती कढई ठेवावी .

 कढाई मध्ये लांब काप केलेले कांद्याचे तुकडे हे थोडा लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यावे , लाल कांदा झाल्यानंतर यामध्ये किसलेला खोबरे  टाकावे , खोबरं हे ओलं असल्यामुळे लवकर भाजल्या जाणार नाही व याचा रेगुलर भाजी सारखा लाल किंवा काळा कलर होणार नाही यामध्ये पाणी जास्त असल्यामुळे याला थोडा वेळ लागेल तरीही नॉर्मल लाल होईपर्यंत खोबरं व कांदा मिक्स थोडं तेल टाकून कढईमध्ये भाजून घ्यावा , हे भाजल्यानंतर कढाई थून बाहेर काढून थोडं थंड करून घ्यावे.

Step 3:- मालवनी चिकन मध्ये जास्त प्रमाणात ओले खोबरे वापरले जाते ,कारण मालवणी चिकन हे उन्हाळ्यामध्ये कोकणमध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ला जात. नारळ हे आपल्या शरीरासाठी थंड असतं आणि चिकन हे गरम असतं उन्हाळ्यामध्ये चिकन रस्सा भाजी बॅलन्स करण्यासाठी आपण मालवणी चिकन रस्सा बनवू शकतो यामुळे शरीरामधील गर्मीचे प्रमाण जास्त वाढणार नाही.

मालवणी चिकन हे मातीच्या भांड्यामध्ये बनवले तर जास्त चांगले लागते ,त्याला वेगळीच चव येते ,जर तुमच्याकडे मातीचे भांडे नसेल तर तुम्ही हे लोखंडी कढईमध्ये सुद्धा बनवू शकता यासाठी कढई किंवा मातीचे भांडे हे गॅस वरती ठेवून घ्यावे ,यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकावे तेल गरम झाले की यामध्ये एक मिडीयम साईजचा कांदा बारीक कट करून टाकावा .

हा छान परतून घ्यावा जेणेकरून याचा कलर लाल होईल, कांदा लाल झाल्यानंतर यामध्ये एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यावी, तीही छान अशी तेलामध्ये तळून घ्यावी, यानंतर आपण मिक्सर मधून काढून घेतलेला मसाला कांदा खोबरं हा त्या तेलामध्ये टाकून घ्यावा , तो दहा ते पंधरा मिनिट भाजून घ्यावा , कांदा खोबरे मसाला मधून तेल बाहेर येईपर्यंत ते कढईमध्ये हळुवारपणे परतून घ्यावा, जोपर्यंत त्या मसाल्यातून तेल बाहेर पडणार नाही तोपर्यंत मालवणी चिकन रस्साला याची चव व सुगंध येणार नाही .

कोणत्याही चिकन ,No-Veg भाजीची चव ही त्या भाजीमध्ये  मसाला कसा वापर केला जातो यावर ठरते, त्यामुळे ओलं खोबरं आणि कांद्यापासून जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये तेल सोडेपर्यंत परतून घ्यावा, त्यानंतर यामध्ये आपण बनवलेला मालवणी मसाला दोन चमचे टाकून घ्यावा. हे सर्व मसाले छान असे परतून घ्यावे ,यानंतर या मसाल्यामधून छान सुगंध येईल.

Step 4:- मसाला छान भाजल्यानंतर या मध्ये मॅरीनेट केलेले चिकन चे तुकडे घालून चमच्याने ते चिकन हळुवारपणे परतत राहावे यामुळे जो आपण मसाला तयार केला आहे ,तो त्या चिकनच्या तुकड्यांना चांगल्या पद्धतीने लागेल, यानंतर या वरती झाकण ठेवून कमी गॅस वरती हे पाच ते सात मिनिटांसाठी शिजू द्यावी ,याच्यामुळे  चिकन आपल्या स्वतःच्या अंगाशीच शिजेल काहीही पाणी न टाकता मसाल्याच्या आणि चिकन स्वतःच्या पाण्याने शिजण्याची चव ही वेगळी लागते .

त्यामुळे थोडे पण पाणी न टाकता मसाला मध्येच पाच ते सात मिनिटे चिकन शिजू द्यावी, पाच ते सात मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर चिकन हे थोडे मऊ झाले असेल. त्यानंतर यामध्ये अर्धा लिटर गरम करून पाणी घालावे व झाकण न लावता पाच ,सहा मिनिट शिजू द्यावे ,  आपण चिकन मध्ये किती रस्सा बनवतो आहे याप्रमाणे त्यामध्ये मीठ घालावे बारीक कोथिंबीर चिरून टाकावी . त्यानंतर अजून दोन मिनिटे शिजु द्यावे अशा पद्धतीने आपले मालवणी चिकन रस्सा पारंपारिक कोकण पद्धतीने तयार झाला आहे सर्वांनी उन्हाळ्यामध्ये मालवणी चिकन रस्सा हा एक वेळेस तरी बनवून खावा.

मालवणी कोकण पारंपरिक पद्धतीने बनवलेले चिकन रस्सा भाजी कशा सोबत खावी

कोकण म्हणलं की भात हा सर्वप्रथम येतो त्यामुळे मालवणी चिकन हे बहुतांश लोक मऊ शिजलेला भातासोबत खातात, पण आपण हे मालवणी चिकन रस्सा भाजी ज्वारीची भाकरी ,बाजरीची भाकरी आणि बहुतांश तांदळाच्या भाकरी सोबत खाऊ शकतो . मालवणी चिकन रस्सा भाजी ही सर्वजण भातासोबत जास्त आवडीने खातात आणि ही भातासोबत खूप चविष्ट सुद्धा लागते .तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्कीच ट्राय करा.

What is Malvani famous for?

What is Malvani masala made of?

What is the price of Malvani chicken masala?

Leave a Comment