Black wheat rate 2024: काळा गहू भाव 299 प्रती किलो; रब्बी व उन्हाळी लागवड !

वाण काळा, पण लाख गुणी,गहू म्हटले की, लाल तांबूस आकाराचे धान्य आपल्या डोळ्यासमोर दिसते पण मी म्हटले, आहो… गहू काळा पण असतो बरं! तर क्षणभर तुमचा विश्वास बसणार नाही… मात्र राज्यात महाबळेश्वरच्या लाल मातीत या काळ्या गव्हाची किमया साधली गेली आहे. या गव्हाचा वाण काळा असला तरी तो लाख गुणी आहे. हा गहू सामान्य गव्हापेक्षा अधिक पौष्टिक आहे बरं का! त्याच काळ्या गव्हाची ही गोष्ट..

जगभर आरोग्याच्या बाबतीत खूप मोठी क्रांती होताना दिसत आहे. कार्बनयुक्त, प्रोटीनयुक्त आहारामुळे जगभर लठ्ठपणा (ओबीसीटी) ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. यावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर संशोधन होत आहे. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही मी खात असलेला गहू मुळात मध्यपूर्वेतील लेबान्त क्षेत्रातील म्हणजे आजचे सिरिया, लेबनान, जॉर्डन, सायप्रस, फिलिस्तान या देशातील गवत होते. त्याच्यातल्या सत्त्वाने ते जगभर खाण्याचे धान्य म्हणून लोकप्रिय झाले.

आज जगभर मक्याच्या पिकाखालोखाल गव्हाचे उत्पादन घेतले जाते. गव्हात कोणते प्रथिने आहेत माहिती व्हावे म्हणून सांगतो, कार्बन ७२ टक्के, कॅलरीज ३४ टक्के, बाकी घटकात पाणी, प्रोटीन, शुगर, फायबर आणि फॅट असते. त्यामुळे हे खूप पौष्टिक अन्न म्हणून जगभर वापरले जाते.

यातील कार्बनच्या अधिकच्या मात्रेमुळे वजन वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर जगभर संशोधन सुरू झाले, त्यात आपल्या देशातही संशोधन सुरू झाले.

काळ्या गव्हाच्या वाणाची निर्मिती

नॅशनल अॅग्री फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, मोहाली, पंजाब येथील प्रयोग शाळेत डॉ. मोनिका गर्ग यांनी काळ्या गव्हाच्या वाणावर संशोधन केले. या काळ्या गव्हात कोणते घटक आहेत, तर यात झिन्क, मॅग्नेशियम, लोह, याचे प्रमाण सामान्य गव्हापेक्षा अधिक असल्यामुळे तसेच ऍथोसायनिन या घटकाचे प्रमाण या गव्हामध्ये १०० ते २०० पीपीएम आहे. त्यामुळे शरीराची होणारी झीज लवकर भरून निघते. या गव्हात शर्करेचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे मधुमेहासारख्या आजारासाठी फायदाच होईल, तसेच काळ्या गव्हाला पाणी कमी लागते, तांबोरा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला नाही आणि फुटव्याची संख्या अधिक असल्यामुळे बियाणे कमी लागते.

ही माहिती देत होते महाबळेश्वर तालुका कृषी सहायक दीपक बोर्डे आणि मी माझ्या पोटावर हात ठेवून ऐकत होतो. कारण शेकडो लोक पोट खूप वाढले यार कमी कसं करू, याची सगळीकडे खूप चौकशी करतात. त्यांना काय माहिती त्यांच्या इन्टेकमध्येच गोंधळ आहे. अशा या बहुगुणी गव्हावर अभ्यास केल्यानंतर दीपक बोर्डे यांनी काही शेतकऱ्यांना पटवून दोन क्विंटल बियाणे मोहालीवरून मागवले.

काळा गव्हाचे फायदे कोणते

काळ्या गव्हात अनेक पोषक घटक असल्यामुळे याचे शरीराला अनेक प्रकारे फायदे मिळतात यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे कर्करोग रक्तदाब मधुमेह अशा आजारासाठी काळा गहू हा वरदान ठरत आहे, त्यामुळे अनेक व्यक्ती आपल्या रोजच्या आहारात काळ्या गव्हाचा वापर करत आहे.

काळा गहू बाजारभाव

कृषी तज्ञच्या अभ्यासानुसार दहा पट अधिक भावाची हमी देणीत येते,अर्धा एकर क्षेत्रावर साधारणता 10000 ते 12000 किलो पर्यंत काळ्या गव्हाचे उत्पन्न मिळते सध्याचा बाजार भाव पकडला तरी कमीत कमी दर 10 हजार रुपये धरला तरी जवळपास 9 ते 15 लाखापर्यंत काळ्या गव्हापासून उत्पन्न मिळवता येते.

Amazon वर  काळा गहू दर  299 प्रती किलो

तुम्ही जर ॲमेझॉन वेबसाईटवर काळा गव्हाचा भाव बघितला तर त्याला पॅकेजिंग करून लोक प्रती  किलो 299 रुपये या दराने विक्री करत आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की काळा गहू किती महाग आहे व यामुळे आपले उत्पन्न कसे वाढणार आहे तुम्हाला हे खात्री करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही या भावाची खात्री करू शकता

Amazon वर  काळा गहू दर  299 प्रती किलो खात्री साठी येथे चेक करा

black wheat

काळ्या गव्हाच्या शेतात

काळ्या गव्हाचा प्रयोग ऐकल्यानंतर कधी एकदा जाऊन हा प्रयोग पाहू असे झाले होते. कारण आता शेतकरी विषमुक्त शेतीत अधिक प्रयोगशील होतो आहे, फक्त त्याला योग्य माहिती व्हायला हवी म्हणून महाबळेश्वर येथील काळ्या गव्हाच्या शेतात जायचे निश्चित केले. वाईचा पसरणी घाट ओलांडून पुढे पाचगणी, नंतर भिलार फाटा त्यापुढे आपण महाबळेश्वरला ज्या केट किंवा विल्सन पॉइंटला जातो.. त्याच्या अलीकडच्या बाजूने दोन एक किलोमीटरवर अवकाळी गाव सह्याद्रीच्या कुशीत लपून बसावे तसे वसलेले आहे.

महाबळेश्वरच्या लाल मातीत काळा गहू

गणेश जांभळे, पंढरीनाथ लांगी (क्षेत्र महाबळेश्वर), मनोहर भिलारे, विजयराव भिलारे (माजी सभापती), अवकाळी (ता. महाबळेश्वर), जयवंत भिलारे, भिलार (ता. महाबळेश्वर) आणि युवराज माने क्षेत्र माहुली (ता. सातारा) या लोकांनी या काळ्या गव्हाच्या वाणाची पेरणी केली. हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. जवळपास सर्वांनी सेंद्रिय पद्धतीने या गव्हाची वाढ केली आहे. कमी पाण्यात एक बियाण्याला सात ते दहा फुटवे येऊन आपल्या साध्या गव्हापेक्षा चांगला आला आहे. सर्वसामान्यपणे आपला लोकवन किंवा इतर गहू कमरेपर्यंत येतात, पण याची उंची कमरेपेक्षा अधिक असून ओंबीचा आकार मोठा आहे.

तिथे मनोहर भिलारे आणि विजयराव भिलारे यांच्या शेतात गेलो. त्यांनी दाखवले हाच तो काळा गहू.. उंच आणि मोठमोठ्या ओंब्या असल्याने मी तर म्हटले याचं काड पांढरं, ओंब्या पण पांढऱ्या, गहू कसा काय काळा. मनोहर भिलारे यांनी गव्हाची ओंबी चुरगाळून आतला गहू काढला तर तो चक्क काळा होता. म्हटले वाण काळा गुण मात्र पांढऱ्याला लाजवणारा!!

पर्यटकांना चाखवणार चव

महाबळेश्वरला दरवर्षी दहा ते बारा लाख पर्यटक देशाच्या कानाकोपऱ्यांतून येतात. त्यांना असे त्यांच्याकडे नसलेले आरोग्यदायी देण्यात आम्हालाही आनंद वाटेल, अशी माहिती शेतकरी विजयराव भिलारे यांनी दिली. त्यांचे स्वतःचे हॉटेल आणि रिसॉर्ट असल्यामुळे त्यांचा गहू थेट त्यांच्या या किचनमध्ये जाईल पण पुढच्या वर्षी त्यांना या गव्हाची अधिक पेरणी करण्याचा मानस आहे. श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथील पंढरीनाथ लांगी म्हणाले, मी प्रत्येक वर्षी गहू पेरतो पण एवढा जोरात कधीच आला नव्हता, आता मी या गव्हाचे बियाणे म्हणून वापरेन. हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता.

प्रयोगशील अधिकारी

महाबळेश्वर तालुका कृषी सहायक दीपक बोर्डे हे कमालीचे प्रयोगशील अधिकारी आहेत. ते तेथील शेतकऱ्यांना काही तरी नवीन करण्याचे प्रोत्साहन देत राहतात. जिल्हा कृषी अधीक्षक गुरुदत्त काळे, उपसंचालक विजयकुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड, तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे यांच्या सहकार्याने नेहमी अग्रेसर असणारे बोर्डे यांच्यासारखे अधिकारी निर्माण व्हावेत. आळस झटकून शिवारे आणि शेतकऱ्यांचे खिसे आणि जनतेचे आरोग्य श्रीमंत होईल, यात शंका नाही.

पेरणी कधी करावी

रब्बी हंगामात तसेच उन्हाळी हे तुम्ही काळे गव्हाची पेरणी  करू शकता जरी उत्पन्न घटले तरी बाजार भाव खूप असल्यामुळे काळ्या गव्हाची  शेती खूप फायदेशीर ठरते,काळा गव्हाची पेरणी करताना शेतामध्ये ओलावा असणे गरजेचे आहे.

काळ्या गव्हाला पाणी केव्हा द्यावे

काळा गहू पेरण्यापूर्वी जमिनीला पाणी देऊन जमिनीमध्ये ओलावा निर्माण करणे गरजेचे आहे तसेच काळा गहू पेरल्यानंतर पेरणीच्या दोन ते तीन आठवड्यांनी पहिले पाणी द्यावे लागते यानंतर दुसरे पाणी काही काळ गेल्यानंतर पीक वर आल्यानंतर फुटण्याचा जो कालावधी असतो त्यावेळी द्यावे लागते.त्यानंतर पिकामध्ये विविध भाग तयार होत असताना तिसरे पाणी द्यावे लागते आणि चौथे पाणी काळ्या गव्हाच्या कोवळ्या ओंबया येण्याच्या वेळी द्यावे लागते व पाचवे पाणी हे गव्हाच्या दुधाळ ओंब्या तयार झाल्यानंतर द्यावे लागते यानंतर शेवटचे पाणी गव्हाच्या दाणे पिकण्याचे वेळी द्यावे लागते अशा प्रकारे काळा गहू घेण्यासाठी एकूण सहा पाणी देण्याची गरज आहे यासाठी तुम्ही तुषार सिंचनाचाही वापर करू शकता किंवा पाण्याचे उपलब्ध जास्त असल्यास भुईट या पद्धतीने हे पाणी देऊ शकता.

Conclusion

शेती करणे म्हणजे एक प्रकारे जुगाड करण्यासारखेच आहे आपण पाहतो की अनेक वेळा उत्पादन खर्च अधिक असतो परंतु त्यातून नफा मात्र काहीच मिळत नाही व स्वखर्चातून नुकसान होते अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांना हार्दिक संकटांना सामोरे जावे लागते त्यामुळेच शेतीची तुलना जुगार असे केले आहे परंतु अशावेळी शेतीतील नवीन नवीन प्रयोग शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढून त्याला आर्थिक प्रगती साधन्यास मदत करणार आहे असाच एक प्रयोग म्हणजे काय उत्पन्न होईल काळ्या गव्हाचे उत्पादन घेऊन कमी जागेत जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याची संधी शेतकऱ्यांना आली आहे त्याचबरोबर आरोग्य दृष्टीने काळा गहू चांगला असल्याने याची मार्केटमध्ये मागणी वाढत आहे ते लक्षात घेऊन शेतकरी आपल्या शेतीतील छोट्या भागात या गावाचे पीक घेऊन प्रयोग करू शकतात.

हे ही वाचा :ओबीसी शिष्यवृत्ती योजना

मोफत बाजारभाव माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment