मटर मशरूम मसाला रेसिपी mushroom masala recipe

मशरूम हे लहानापासून ते मोठ्यां पर्यत आणि व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन दोघांना आवडतं. मशरूम लहान मुले खूप आवडीने खातात त्याची चव लहान मुलांना खूप आवडते. मशरूम खाण्यासाठी खूप हेल्दी आहे.

आज काल मशरूम खाण्याची संख्या ही भारतामध्ये खूप प्रमाणात वाढली आहे. नॉन व्हेजिटेरियन खाणाऱ्या लोकांना नॉनव्हेज खायला खूप आवडते परंतु जे नॉन व्हेजिटेरियन नाहीये. म्हणजे व्हेज खाणाऱ्या लोकांसाठी मशरूम हा उत्तम पर्याय आहे.

मशरूम चवीला खूप चविष्ट असते मशरूम हे एकदम व्हेज आहे. परंतु मशरूमची चव ही एखाद्या नॉनव्हेज भाजीला सुद्धा मागे टाकते. मशरूम भाजी मध्ये खूप सारे प्रकार आहेत.

जसे की मशरूम करी ,मशरूम मसाला, मशरूम फ्राय, मटर मशरूम मसाला, चिली मशरूम. मशरूम हे प्रत्येक रेसिपी मध्ये वेगळी चव देते, त्यामुळे आज आपण मशरूमची एक वेगळी चव पाहूया, त्यासाठी आज आपण मटर मशरूम मसाला कसा तयार करायचा हे पाहूया.

मटर मशरूम मसाला बनवण्यासाठी लागणारी सामग्री Mushroom Matar Masala Ingredients

  • मशरूम (अर्धा किलो)
  • मटर (दोनशे ग्रॅम)
  • कांदे (दोन मिडीयम साईजचे कांदे स्लाईस मध्ये कट करून)
  • टोमॅटो (तीन मिडीयम साईजचे टोमॅटो मोठा कट करून)
  • दही(दोन ते तीन चमचे)
  • लसन (सोलून)
  • अद्रक (दोन इंच अद्रक चा तुकडा)
  • जिरे (दोन चमचे)
  • कोथिंबीर
  • धना पावडर (दोन चमचे)
  • लाल मिरची पावडर (दोन चमचे)
  • गरम मसाला (एक चमचा)
  • हिरवी मिरची (दोन ते तीन)
  • गव्हाचे पीठ (दोन ते तीन चमचे)
  • तेज पत्ता (एक ते दोन)
  • मीठ( चवीनुसार)
  • पाणी (आवश्यकतेनुसार)

मशरूम बनवण्यासाठी लागणारा कालावधी

मटर मशरूम मसाला बनवण्यासाठी कमीत कमी 30 मिनिटे वेळ लागतो यासाठी मसाला ग्रेव्ही बनवण्यासाठी पंधरा मिनिटे व पूर्ण भाजी बनवण्यासाठी पंधरा मिनिटे, अशा वेळामध्ये आपली मटर मशरूम मसाला भाजी तयार होते.

मटर मशरूम मसाला बनवण्यासाठी ची कृती mushroom masala recipe

मित्रांनो हॉटेल स्टाईल मध्ये मटर मशरूम मसाला बनवण्यासाठी ची कृती आपण या आर्टिकल मध्ये पाहूया. बहुतांश लोकांना मटार मशरूम मसाला बनवत असताना अडचणी येतात. मटर मशरूम मसाला मध्ये तो फ्लेवर येत नाही.

त्याची चव बदलते, आपण या लेखामध्ये कमी वेळामध्ये मटर मशरूम मसाला हॉटेल स्टाईल मध्ये आणि मस्त चवीचा कसा तयार करायचा हे जाणून घेऊया. हे आर्टिकल तुम्ही पूर्ण वाचा यामध्ये तुम्हाला मी काही अशा टिप्स सांगेन ज्याने मटर मशरूम मसाला हा एकदम हॉटेल स्टाईल मध्ये बनेल.

Step 1

सर्वप्रथम मटर मशरूम मसाला बनवण्यासाठी विकत आणलेले मशरूम स्वच्छ धुऊन घेऊया. मी तुम्हाला मशरूम कसे साफ करायचे हे पहिले सांगेल .आज काल बाजारामध्ये मशरूम हे एकदम साफ केलेले भेटतात.

पण जरी तुम्हाला मशरूम हे साफ केलेले भेटले नसतील मशरूम वरती काळे डाग असतील तर ते एकदम सोप्या पद्धतीत कसे साफ करायचे ते तुम्हाला मी सांगते.

 मशरूम साफ करण्यासाठी विकत आणलेल्या मशरूम एका बाऊलमध्ये काढून घ्या. या बाऊलमध्ये दोन ग्लास पाणी एक चमचा मीठ घालून मशरूम हलक्या हाताने साफ करून घ्या. हे मशरूम साईडला काढून घ्या व या मशरूम वरती दोन ते तीन चमचे गव्हाचे पीठ टाका.

गव्हाचे पीठ का बरं. कारण गव्हाच्या पिठामुळे मशरूम वरचे घाण लवकर साफ केली जाते. त्यामुळे मशरूम वरती दोन चमचे गव्हाचे पीठ टाकून एक एक मशरूम हलक्या हाताने साफ करून घ्या.

 तुम्हाला हे दिसून येईल की त्यावरचे काळे डाग हे निघून गेले असतील. मशरूम साफ करताना याची काळजी घ्यावी की मशरूम सॉफ्ट असतात .त्यामुळे याला जास्त रफली साफ करू नका. एकदम हलक्या हाताने साफ करून घ्या.

आता मशरूम पूर्ण साफ झाले असतील तर त्यामध्ये दोन ग्लास गरम पाणी घालून व एक चमचा मीठ घालून हलक्या हाताने धुऊन साईडला काढून घ्या. यानंतर मशरूमला कट करून घ्या. मशरूम कट करण्यासाठी तुम्ही मशरूमचे चार भाग करू शकता नाहीतर मशरूम से स्लाईस मध्ये कट करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार मशरूम कट करून घ्या.

मशरूम मॅरीनेट कसे करायचे How to marinate mushroom

Step 2

आपण मटर मशरूम मसाला हे एकदम हॉटेल स्टाईल मध्ये बनवत असल्यामुळे मशरूमला मॅरीनेट करून ठेवावे, या पद्धतीने मटर मशरूम मसाला  तुम्ही बनवला तर नॉनव्हेज भाजीच्या चवी सारखी मशरूमची चव येईल. त्यामुळे या स्टाईल मध्ये मशरूम मसाला नक्की ट्राय करा.

 साफ करून घेतलेले मशरूम हे एका बाऊलमध्ये घालून त्यावरती दोन चमचे गरम मसाला पावडर व एक चमचा मटन मसाला पावडर ,एक अर्धा चमचा मीठ घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्या. व हे थोड्या वेळासाठी रेस्टला राहू द्या. आपण मॅरीनेट करण्यासाठी मटन मसाला चा युज करत आहोत. मटन मसाला युज करत आहोत याचा अर्थ असा नाहीये की ये नॉनव्हेज आहे.

मटर मशरूम मसाला हा Pure व्हेज असतो. मटन मसाला मध्ये खडा मसाला चा युज केला जातो त्यांनी मशरूमचे फ्लेवर अजून जास्त निरखून येतो .जर तुम्हाला मटन मसाला युज नसेल करायचा, तर तुम्ही दुसरा कोणत्याही प्रकारचा मसाला युज करू शकता त्यासाठी किचन किंग मसाला, अंबारी मसाला असा दुसरा कोणताही मसाला मॅरीनेट करताना तुम्ही टाकू शकता. दहा ते पंधरा मिनिटे झाल्यानंतर मॅरीनेट केलेले मशरूम फ्राय करून घेऊया.

Step 3

मशरूम फ्राय करण्यासाठी एका पॅनमध्ये दोन चमचे बटर टाकून घ्या. ते थोडे गरम झाले असल्यास त्यामध्ये मॅरीनेट केलेले मशरूम हे चांगले फ्राय करून घ्या. यामुळे मशरूमला खूप छान फ्लेवर येईल.

Step 4

मशरूम मॅरीनेट करून झाल्यानंतर आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया. मशरूम मसाल्याची ग्रेव्ही तयार करून घेण्यासाठी सर्वात प्रथम आपण एक कढई गॅस वरती  ठेवूया. त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून तेल चांगले गरम होईपर्यंत राहू द्या.

या दरम्यान गॅसची फ्लेम हाय ठेवा. तेल चांगले गरम झाले असेल, त्यानंतर त्यामध्ये बारीक साईडचे लांब कट केलेले दोन कांदे टाका व ते कांदे छान परतून घ्या. तेलामध्ये कांदे परतत असताना याची काळजी घ्या. की कांदा हा जास्त लाल झाला नाही पाहिजे.

एकदम हलका लाल होईपर्यंत कांदा परतून घ्या .गॅसची फ्लेम हाय असल्यामुळे त्यामध्ये सतत चमचा फिरवत कांदा परतून घ्या. कांदा परतत असताना थोड्याच वेळात कांद्याचा हलका लाल कलर येईल. जास्तीत जास्त तीन ते चार मिनिटांमध्ये आपला कांदा हलका लाल होईल. आपण कांदा हा जास्त लाल का करून घेत नाहीये.

 त्याचं कारण असं आहे की कांदा जास्त लाल झाल्यानंतर तो चांगला शिजला जात नाही तो स्लाईस पीस मध्ये तसाच राहतो .त्यामुळे कांदा जास्त लाल न करता हलका लाल असू द्या. त्यानंतर यामध्ये आपण घेतलेली अद्रक लसन व हिरवी मिरची टाकून परतून घ्या. या सर्व मसाल्याला सुद्धा दोन ते तीन मिनिट परतून घ्या याला सुद्धा जास्त वेळ भाजायची गरज नाहीये. यामध्ये फक्त कच्चापणा राहू नये इतकेच भाजून घ्यायचे आहे.

Step 5

यानंतर यामध्ये आपण कट केलेले तीन टोमॅटो टाकून घ्या. टमाटर टाकल्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घालून छान असे टोमॅटो परतून घ्या .आपल्याला टोमॅटो हे चांगले शिजवून घ्यायचे आहेत त्यामुळे चार ते पाच मिनिटे मिडीयम फ्लेम वरती टोमॅटो व बाकी मसाले मिक्स करून परतून घ्या.

त्यानंतर यावरती झाकण ठेवा मधून मधून झाकण काढून चमच्याने मसाला हलवत रहा. जेणेकरून मसाला हा पॅनला खाली चिकटणार नाही व तो चांगला शिजल. थोड्याच वेळात झाकण उघडून पाहिले असता तुम्हाला समजेल की आता पूर्ण मसाला चांगला शिजला असेल .यानंतर गॅस बंद करून ही ग्रेव्ही साईडला ठेवून द्या जेणेकरून हे थंड होईल.

पाच मिनिट मध्ये आपण तयार केलेल्या मसाला हा थंड होईल त्यानंतर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे काढून घ्या व बनवलेली ग्रेव्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्या हे बारीक करत असताना काळजी घ्या कारण मसाला हा पूर्णपणे थंड झालेला नसेल त्यामुळे मिक्सरच्या भांड्यावर ते कपडे ठेवून ग्रेव्ही बारीक करून घ्या त्यामुळे मिक्सर चे झाकण उघडणार नाही किंवा मसाला बाहेर येणार नाही.

अशाप्रकारे मटर मशरूम मसाला ग्रेव्ही तयार आहे चला तर मग पुढच्या स्टेप मध्ये मटर मशरूम मसाला बनवून घेऊया.

Step 6

मटर मशरूम मसाला बनवण्यासाठी एक कढई गॅस वरती मिडीयम फ्लेम वरती ठेवा. त्यानंतर यामध्ये दोन चमचे तेल टाका .तेल चांगले गरम झाले असल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे जिरे टाका. त्यानंतर त्यामध्ये एक तेज पत्ता टाका.

तेच पत्ता मुळे भाजीला खूप चांगला फ्लेवर येतो.जास्तही तेच पत्त्याचा वापर करू नका एक तेच पत्ता बस होईल. यानंतर कढई मध्ये आपण तयार केलेली ग्रेव्ही टाका. ग्रेव्हीचा हलका कलर पिवळसर असेल.

 ग्रेव्ही तेलामध्ये चांगले शिजवून घ्या सोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेली ग्रेव्ही त्यामध्ये थोडे पाणी घालून कढई मध्ये टाकून घ्या ,व पाच मिनिट शिजू द्या. हे ग्रेव्ही शिजवत असतानाच एक चमचा लाल तिखट व अर्धा चमचा हळद टाका.

यामुळे ग्रेवी शिजत असतानाच ग्रेव्हीला छान कलर येईल व मसाल्यामध्ये तिखट मिक्स होईल. ही ग्रेव्ही चांगली शिजू द्या. ग्रेव्हीमधून तेल बाहेर येईपर्यंत कमी फ्लेम वरती ही ग्रेवी शिजू द्या. मधून मधून ही ग्रेव्ही चमच्याने हलवत रहा जेणेकरून ही कढईला खाली चिकटणार नाही.

आता तयार झालेल्या ग्रेव्हीमध्ये दोन चमचे धना पावडर व दोनशे ग्रॅम मटर टाका .जर तुम्ही विकत आणलेल्या फ्रोजन मटर वापरत असाल, तर या सोबतच मशरूम चे पीस टाका परंतु जर तुम्ही घरीचे मटर युज करत असाल, तर मटर ला थोडा वेळ मसाला मध्ये शिजू द्या.

कारण फ्रोजन मटर हे थोडं मऊ असतं त्यामुळे त्याला जास्त वेळ शिजायला लागत नाही. मटर लगेच शिजत .परंतु घरचे मटार याला थोडा वेळ शिजायला लागतो. त्यामुळे या ग्रेव्हीमध्ये मटर टाकून त्यावरती दोन चमचे दही व दोन चमचे जिरे पावडर ,दोन चमचे गरम मसाला टाकून चमच्याने छान हलवून घ्या.

ग्रेव्हीमध्ये मटर हे चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून झाकण लावून शिजू द्या .कारण मटर थोडे शिजले मऊ झाले की त्यामध्ये फ्राय केलेले मशरूम टाका आणि मिक्स करून घ्या जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त आवडते तर यामध्ये थोडं पाणी टाकून शिजवून घ्या.

जर तुम्हाला ठीक ग्रेव्ही आवडत असेल तर तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी ऍड करत राहा पाणी ऍड करून झाल्यानंतर झाकण लावून पाच ते सात मिनिट कमी फ्लेम वरती शिजू द्या. गॅसची फ्लेम कमी असू द्या. यामुळे सर्व काही मसाले मटर आणि मशरूम हे छान असे शिजेल.

अशाप्रकारे आपली मटर मशरूम मसाला रेसिपी तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा.

FAQ

मटर मशरूम मसाला भाजी कशी सर्व्ह करावी ?

मटर मशरूम मसाला भाजी ही आपण तंदुरी ,नान, चपाती, रोटी ,भात या सर्व सोबत खाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला कशा सोबत आवडते त्याच्यासोबत मटर मशरूम मसाला भाजीची मजा घ्यावी . अर्धा किलो मशरूमची भाजी हे घरामध्ये पाच ते सहा जण आरामशीर पोट भरून खाऊ शकतात त्यामुळे कमी वेळामध्ये मस्त जेवण बनवू शकतो पाहुणे आले असतील तरी मटर मशरूम मसाला भाजी हे उत्तम निवड आहे जेवण बनवण्यासाठी. नक्की तयार करून पहा.

मटर मशरूम मसाला कसा तयार करावा ?

मटर मशरूम मसाला कसा तयार करायचा त्याची रेसिपी ही वरील दिलेल्या पूर्ण आर्टिकल मध्ये आहे .हे पेज तुम्ही पूर्ण वाचा तुम्हाला सोप्या पद्धतीत कमीत कमी वेळामध्ये आणि एकदम हॉटेल स्टाईल मध्ये मटर मशरूम मसाला कसा तयार करायचा हे समजून जाईल.

मशरूम हे व्हेज आहे की नॉनव्हेज?

मशरूम हे व्हेज आहे. मशरूम मध्ये न्यूट्रिशन भरपूर प्रमाणात आहेत ,आणि या न्यूट्रिशनमुळे मशरूम व्हेज मध्ये मोडला जातो. त्यामुळे मशरूम हे पिवर व्हेज आहे.

मशरूम करी ही आरोग्यासाठी चांगले आहे का ?

हो .मशरूम करी ही आरोग्यासाठी चांगली आहे .कारण मशरूम मध्ये बी जीवनसत्वे (Vitamin-B)  आणि पोटॅशियम चे प्रमाण जास्त आहे .त्यामुळे हे शरीरासाठी खूप चांगले आहे . मशरूम करी कॅलरीज आणि कर्बोधकांमध्ये कमी आहे. त्यामुळे एक हलके जेवण म्हणून मशरूम करीचा आपण वापर करू शकतो.

पनीर पेक्षा मशरूम चांगला आहे का?

पनीर मध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन (protein) आणि कॅल्शियम (calcium ) असते ज्यामुळे पनीर हे वजन कमी करण्यासाठी मदत करतात .पनीर मध्ये कर्बोदकाचे प्रमाण सुद्धा कमी असते. आणि प्रथिने जास्त असतात, त्यामुळे मधुमेहासाठी पनीर चांगले असते .यासोबत मशरूम ग्लासमिक इंडेक्स 15 आहे. असल्यामुळे मधुमेहासाठी अनुकूल असतो.

आपण कच्चा मशरूम खाऊ शकतो का?

नाही. बिलकुल नाही. मशरूमची शेती ही अन्य भाजीपाल्याच्या शेतीपेक्षा वेगळी असते . मशरूम पिकवत असताना त्यावरती वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात, त्यामुळे मशरूम हे नेहमी धुवून साफ करून आणि शिजवूनच खाल्ले गेले पाहिजे .मशरूम हे पचन होण्यासाठी थोडे कठीण असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपचन वाढते. त्यामुळे मशरूम हे नेहमी शिजवून खाल्ले पाहिजे.

Leave a Comment