पारंपारिक पद्धतीने बनविलेली सुरमई फ्राय Surmai Fry Recipe In Marathi

कोकणातच नाही तर पूर्ण भारतामध्ये मासे seafood खूप आवडीने खाल्ले जाते. त्यामध्ये पापलेट, सुरमई, ब्रांच अशा वेगवेगळ्या पद्धतीचे मासे आवडीने खाल्ले जातात .आता मासे बनवण्याचा वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मासे बनवले जातात. परंतु पारंपारिक  पद्धतीमध्ये बनविलेले मासे हे खूप कमी खायला मिळत आहेत .आपण हॉटेलमध्ये, रेस्टॉरंट मध्ये ,धाब्यावरती वरती मासे खातोच परंतु चुलीवर बनवलेले आजीच्या हातच्या Fish Fry चव ही वेगळीच असते. तर आज  पारंपारिक पद्धतीने बनवलेली सुरमई Fry कशी बनवायची ही जाणून घेऊया.

बहुतांश वेळेस सुरमई फ्राय ही दोन पद्धतीने केली जाते एक तर नॉर्मल मसाला लावून सुरमई फ्राय केली जाते आणि दुसरी म्हणजे रवा लावून सुरमई फ्राय केली जाते .तर आपण यामध्ये या दोन्ही पद्धतीने सुरमई कशी Fry करायची हे जाणून घेऊया.

सुरमई फ्राय करण्यासाठी लागणारी सामग्री Ingredients of chilli chicken

  • तेल चवीनुसार
  • २ ते ४ चमचे कोकम -१ लिंबू
  • ७ ते ९ लसूण पाकळ्या सोलून
  • कोथंबीर चिरून
  • मीठ चवीनुसार
  • घरगुती लाल मिरची पावडर दोन चमचे
  • एक मोठा चमचा हळद
  • दोन चमचे  तांदळाचे पीठ
  • दोन मोठे चमचे रवा

सुरमई फ्राय बनवण्यासाठी ची कृती How to make Surmai Fry

Step 1

सर्वप्रथम बाजारातून आणलेली सुरमई ही लांब आकारात कट करून घ्यावी, सुरमई चांगली साफ करून घ्यावे ,कट केल्यानंतर त्याला दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे सुरमई मासा धुवत असताना एक काळजी घ्यावी तो हलक्या हाताने धुऊन घ्यावा त्याच्याशी जास्त छेडछाडी करून घेऊ नये ,कारण मासा हा मऊ असतो .मटन ,चिकन सारखे त्याला धुतले जात नाही हलक्या हाताने धुतल्याचे कारण हे की मासा तुटू नये. मासा म्हटलं की थोडा वास येतो त्यामुळे स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर यामधून कुठल्याही प्रकारचा वास येणार नाही सुरमई माशाचे तुकडे हे मिडीयम असावे.

सुरमई फ्राय करण्यासाठी सर्वात आधी लसन, कोथिंबीर ही मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यावी . हे बारीक केलेली पेस्ट फक्त लसन आणि कोथिंबीरची आहे यामध्ये अद्रक घालू नये. हे पेस्ट करून झाल्यानंतर, जर घरी कोकम असेल तर कोकम पाण्यामध्ये टाकून मोठ्या प्लेटमध्ये टाकून घ्यावे ,जर कोकम नसेल तर आपण लिंबू सुद्धा घेऊ शकतो तर लिंबू एका अर्ध्या वाटी पाण्यामध्ये पिळून घ्यावे व ते पाणी प्लेटमध्ये टाकून घ्यावे जेणेकरून सुरमईचे केलेले तुकडे त्यामध्ये भिजवले जाऊ शकतील.

सुरमईच्या तुकड्यावरती कोकम चे पाणी जेवढ्या चांगल्या पद्धतीने लागेल तेवढी माशाची चव छान उतरते मासे बनवताना सर्वात जास्त मीठ आणि कोकम चे पाणी/ लिंबाचे पाणी छान लावायला पाहिजे जेणेकरून माशाची चव अजून चांगली येते. जसा Non-Veg बनवताना मसाला ,कांदा ,लसूण अद्रक ,खोबरं यामुळे चिकन, मटन ची चव चांगली होते तसे Fish Fry करताना कोकम, मिट, लिंबू यामुळे Test येते. जर घरी कोकम नसेल तरच लिंबूचा ऑप्शन निवडावा परंतु कोकम वापरून सुरमई फ्राय केली तर सुरमईची चव ही जास्त चांगली लागते. तर सुरमई फ्राय करताना बहुतांश वेळेस कोकम चेच पाणी वापरावे.

Step  2

प्रत्येक सुरमईचा पीस हा कोकमच्या पाण्यामध्ये  दोन्ही साईडने हलक्या हाताने बुडवून घ्यावे ,म्हणजेच सूरमेच्या तुकड्याच्या दोन्ही साईडने कोकमच्या पाण्यामध्ये बुडवून साईडला काढून घ्यावे जेणेकरून कोकणचे पाणी हे सुरमेच्या दोन्ही साईडला चांगल्या पद्धतीने लागेल .यानंतर सुरमई वरती चवीनुसार मीठ टाकून हळू हाताने मीठ सर्व सुरमईच्या तुकड्यांवरती लावून घ्यावे जेणेकरून मासा तुटू नये यामुळे हळू हाताने मीठ लावून घ्यावे. त्यानंतर एक मोठा चमचा हळद सुरमईच्या तुकड्यांवरती हळुवार पसरून घ्यावी जेणेकरून सुरवई मोडली नाही पाहिजे हळुवार हाताने हळद पूर्ण तुकड्यांवरती लावून घ्यावे.

नंतर सर्वप्रथम बनविलेले कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट ही सुरमईच्या तुकड्यांवर ते अलगद हाताने पसरून घ्यावे हा मसाला सर्व तुकड्यांवरती समान लावून घ्यावा. अशा पद्धतीने सर्व मसाला सुरमई वरती लावून, सुरमई दहा ते पंधरा मिनिटांसाठी साईडला ठेवावी जेणेकरून या मसाल्याचा चव व सुगंध माशांमध्ये उतरला जाईल.

दहा पंधरा मिनिटे झाल्यानंतर आपल्याला हे समजून येईल की सुरमई माशाने कोकम आणि मिठाच्या पाण्यामुळे पाणी सोडले आहे त्यामुळे याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकायची काहीही गरज नसते. यानंतर त्यामध्ये एक दोन चमचे लाल तिखट टाकून सर्व सुरमई मासा वरती अलगद हाताने लावून घ्यावा जेणेकरून हे लाल मसाला पूर्ण माशांच्या दोन्ही साईडने चांगला लागला जाईल. आता हे मॅरीनेट केलेले मासे थोडा वेळ साईडला ठेवून घ्या.

Step  3

सर्वप्रथम सांगितल्याप्रमाणे सुरमई हे आपण दोन प्रकारे फ्राय केली जाऊ शकते. एक म्हणजे रवा लावून आणि दुसरी म्हणजे मसाला लावून यामध्ये दोन प्रकारचे सुरमई फ्राय ची कृती मी सांगणार आहे. मॅरीनेट केलेले सुरमई चे तुकडे हे दोन्ही कृतीसाठी चालतील मॅरीनेशन झाल्यानंतर दहा मिनिटाच्या ब्रेकनंतर आपण वेगवेगळी कृती करू शकतो .

कारण दोन्ही पद्धतीने बनवण्यासाठी मॅरीनेटेड सुरमई ही एकच लागणार आहे. त्यामुळे आपल्याला रवा सुरमई फ्राय साठी वेगळी मॅरीनेट सुरमई किंवा मसाला सुरमई फ्रायसाठी वेगळी मॅरीनेट सुरमई ची गरज भासणार नाही .आपण एक वेळेस मॅरीनेट केलेली सुरमई ही दोन्ही पद्धतीला वापरू शकतो चला तर मग जाणून घेऊया मसाला आणि रवा सुरमई फ्राय.

मसाला लावून सुरमई फ्राय कृती How to make Masala Surmai Fry

मासे खाणाऱ्या मध्ये काही जणांना मासे हे रवा लावून आवडतात तर काही जणांना प्लेन मसाला लावून फ्राय केलेले आवडतात .अशांसाठी मासे हे सिम्पल मसाला लावून फ्राय करू शकता. यासाठी आपण तवा गॅस वरती ठेवून घ्या, यावरती दोन चमचे तेल घालून पूर्ण तव्यावरती चमच्याने तेल पसरून घ्यावे , जेणेकरून तव्याच्या पूर्ण भागाला चांगले तेल लागले जाईल मासे बनवण्यासाठी जास्त तेलाचा वापर करायचा नाही, कमी तेलामध्ये सुद्धा सुरमई फ्राय होते त्यामुळे दोन ते तीन चमचे तेल तव्यावरती पूर्ण भागावरती पसरून घ्या ,जेणेकरून कमी तेल असताना देखील तव्याचा सर्व भागाला तेल लागले जाईल.

तवा गॅस वरती ठेवल्यानंतर एवढी काळजी घ्यावी की गॅसची फ्लेम ही कमी असावी जास्त हाय फ्लेम वरती नसावा. जेणेकरून सुरमई करपणार नाही ,ही काळजी मासे बनवताना घ्यावी. तव्यावर टाकलेले तेल गरम झालं असेल तर त्यावरती अलगद हाताने मॅरीनेट केलेले मासे ठेवून घ्यावे, तव्यावरती बसतील एवढेच मासे त्यावर टाकावे कारण जेव्हा आपण फ्राय केल्यानंतर माझा बदलायला जातो तेव्हा तो मासा तुटू शकतो, किंवा आपल्यालाही त्रास होऊ शकतो.

    त्यामुळे तव्यावरती चार ते पाच मासे टाकून एका चिमट्याने किंवा चमच्याने त्याला परतायला जागा भेटेल एवढ्या जागा ठेवावी जेव्हा मॅरीनेट केलेला मासा तेलावर तव्यावरती टाकला त्याचा नंतर साईटने त्याला चमच्याने तेल सोडत राहावे जेणेकरून तो मासा कडक होईल कारण आपण रवा लावत नाही त्यामुळे हा मासा थोडा सॉफ्ट सॉफ्ट राहू शकतो. त्यामुळे थोडं तेल साईटने टाकत राहिलं तर तो मासा कडक होईल . एक साईडने  लाल खरपूस असा मासा फ्राय झाला असेल तेव्हा सुरमई माशाची साईट बदलून घेऊन दुसऱ्या साईडने मासा सेम तसाच भाजून घ्यावा.  या प्रकारे दोन्ही साईड चांगलं लाल होईपर्यंत खरपूस कलर ब्राऊन येईपर्यंत फ्राय करून घ्यावा.

मासा हा थोडा जास्त फ्राय केलेला चांगला लागतो परंतु असं नाही की जास्त फ्राय करताना करपला जाईल. गॅस हा नेहमी कमी फ्लेम वरती ठेवा. दोन्ही साईड ने छान फ्राय झाल्यानंतर सुरमई साईटला काढून घ्या.

अशा प्रकारे बिना रव्याचे म्हणजेच सिम्पल  मसाल्याची सुरमई फ्राय तयार आहे.

मसाला सुरमई फ्राय आपण कशा सोबत खावी

 सुरमई फ्राय ही आपण भाकरी सोबत भातासोबत किंवा अशीच खाऊ शकतो .मोस्टली सर्वांना सुरमई फ्राय किंवा मासा कुठलाही फ्राय मासा कशा सोबतही न खाता असाच खायला खूप आवडतो परंतु Fish फ्राय हा प्लेन भातासोबत सुद्धा खूप चांगला लागतो सुरमई फ्राय ही मूळची कोकणातली डिश आहे त्यामुळे कोकण म्हटलं की भात येतोच त्यामुळे कुठलाही कोकणातला पदार्थ हा भाताशिवाय एकटा आहे. सुरमई फ्राय ही भातासोबत खूप चविष्ट लागते.

रवा लावून पारंपारिक पद्धतीने सुरमई फ्राय करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा रवा दोन चमचे, तांदळाचे दोन चमचे पीठ आणि अर्धा चमचा मीठ व तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकून ते चांगलं मिक्स करून घ्या ,कोरड्या हाताने हे मिक्स करून घ्या ,जेणेकरून यामध्ये पाणी टाकू नये ,हे मिक्स झाल्यानंतर , मॅरीनेट केलेले सुरमई चे तुकडे घ्या , आपण तयार केलेल्या रवा , सुरमईच्या मॅरीनेट केलेल्या तुकड्यावरती दोन्ही बाजूला हलक्या हाताने लावून घ्या. प्रत्येक माशाला हा रवा बरोबर लागला पाहिजे दोन्ही साईडने हे मिक्सर लावून घ्या.

यानंतर चुलीवरती नसेल तर गॅस वरती तवा ठेवा. गॅस वरती तवा हा कमी फ्लेम वरती ठेवा. तव्यावरती थोडसं तेल टाका तेल ,तव्याला सगळी कडे तेल लावून घ्या , सुरमई फ्राय करण्यासाठी जास्त तेलाचा वापर करायची गरज नाहीये थोड्या तेलामध्ये सुद्धा सुरमई फ्राय होते . तव्याला सगळी कडे तेल पसरून लावून घ्या.

रवा लावून घेतलेल्या सुरमईच्या तुकडे अलगद हाताने तव्यावरती सुटसुटीत बसतील एवढेच ठेवा. जेणेकरून ते तुटू  नये  .पलटत असताना तुम्हाला त्रास होऊ नये ,जर तव्यावरती सगळीकडे आपण तुकडे ठेवले तर आपल्याला पलताना त्रास होऊ शकतो नाहीतर सुरमई चे तुकडे मोडू शकतात त्यामुळे चार ते पाच तुकडे तव्यावरती अलगद हाताने ठेवा. माशाचे तव्यावर ठेवलेले तुकडे हे एका साईडने फ्राय होत असताना आपण चमच्याने तव्यावरती साईट न तेल सोडत राहा जेणेकरून सुरमई फ्राय होत असताना त्याच्यामध्ये कडकपणा येईल आणि सुरमयी चिटकणार सुद्धा नाही साईटने तेल सोडत राहिले तर तेल सुरमई मध्ये पर्यंत जाईल.

एका साईटने मस्त लाल फ्राय झाल्यानंतर, माशांना चमच्याने अलगदपणे पलटून घ्या आणि सेम या साईट सारखंच दुसरी साईट सुद्धा लाल होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करा दुसरी साईड फ्राय करत असताना सुद्धा चमच्याने साईडने तेल सोडत रहा जेणेकरून मासा तव्याला चिकटणार नाही. सुरमई ही ब्राऊन कलर थोडासा लालसर कलर होईपर्यंत फ्राय करा जास्त हाय फ्लेम वरती फ्राय केल्याने सुरमई करपू शकते त्यामुळे कमी फ्लेम वरती थोडा वेळ जाऊ पर्यंत हळुवारपणे परतून घ्या दोन्ही साईडने सेम ब्राऊन कलर होईपर्यंत सुरमई ट्राय करा.

अशाप्रकारे तुमचा रवा लावून पारंपारिक पद्धतीने सुरमई फ्राय तयार आहे.

रवा सुरमई फ्राय आपण कशा सोबत खावी

सुरमई फ्राय ही आपण भाकरी सोबत भातासोबत किंवा अशीच खाऊ शकतो मोस्टली सर्वांना सुरमई फ्राय किंवा मासा कुठलाही फ्राय मासा कशा सोबतही न खाता असाच खायला खूप आवडतो परंतु मासा  फ्राय हा प्लेन भातासोबत सुद्धा खूप चांगला लागतो सुरमई फ्राय ही मूळची कोकणातली डिश आहे त्यामुळे कोकण म्हटलं की भात येतोच त्यामुळे कुठलाही कोकणातला पदार्थ हा भाताशिवाय एकटा आहे. सुरमई फ्राय ही भातासोबत खूप चविष्ट लागते.

FAQ

सुरमई मासा चवीला कसा लागतो?
How does Surmai fish taste?

सुरमई माशाला एक विशिष्ट आहे. सुरमई मासा हा मॅक्रम कुटुंबांमधील आहे यामुळे हा मासा बाजारामध्ये महाग विकला जातो व विशिष्ट प्रसंगासाठी व विशिष्ट चवीमुळे हा मासा जास्त प्रमाणात खाल्ला जातो.

सुरमई मासा हा आरोग्यासाठी चांगला आहे का?
Is Surmai fish good for health?

सुरमई मासाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. सुरमई माशांमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते प्रथिने जास्त असतात आणि त्यात आवश्यक असते. सुरमई मध्ये प्रथिनेचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते कॅल्शियम आणि फॉस्फेट देखील चांगल्या प्रमाणात प्रदान करते . अशाप्रकारे सुरमई मासा खाणे हा आरोग्यासाठी खूप चांगला आहे

सुरमई मासा हा हाडाचा मासा आहे का?
­Is Surmai a bony fish?

सुरमई मासा हा स्वादिष्ट मासा आहे जो त्याच्या चवीसाठी आणि आरोग्यासाठी खूप प्रमाणात खाल्ला जातो सुरमई मासा हा मोठ्या हाडासह मासियुक्त मासा आहे सुरमई मासा मध्ये मोठा हाड असते त्यामुळे सुरमई मासा हा खाण्यासाठी खूप सोपा आहे

सुरमई किंवा पापलेट कोणता मासा चांगला आहे?
Which fish is good Surmai or pomfret?

सुरमई मासा हा स्पष्टपणे कॅलरीज आणि प्रोटीन युक्त मासा आहे यामध्ये ओमेगा थ्री आणि वेगवेगळे विटामिन आढळतात हा मासा सवयी सोबत शरीरासाठी सुद्धा खूप गुणकारी आहे व पापलेट मासा हा विदेशी मासा असल्यामुळे भारतामध्ये याची खूप मागणी असते पापलेट मासा हा चवीसाठी अत्यंत चविष्ट स्वादिष्ट आणि पांढरे मास असलेला आहे दोन्ही मासे हे चविष्ट आहेत.

Leave a Comment