तंदुरी चिकन रेसिपी Tandoori Chicken Recipe in Marathi

तंदुरी चिकन एकदम हॉटेल स्टाईल मध्ये घरी कसं बनवायचं?  हे आज आपण पाहूया सर्वांना हॉटेल मधलं आणि धाब्यावरचा तंदुरी चिकन हे खाण्यासाठी खूप आवडतं.  कारण तंदुरी चिकन दिसताना खूप छान दिसत,  आणि तंदुरी चिकन चा स्मोकी फ्लेवर हे तंदुरी चिकनची चव अजून जास्त वाढवतो तंदुरी चिकन बनवताना सर्वांना काही अडचणी फेस करावे लागतात, जसे की तंदुरी चिकन हॉटेल स्टाईल मध्ये दिसत नाही,  त्याचा फ्लेवर तसा येत नाही,  किंवा तंदुरी चिकन हॉटेल स्टाईल मध्ये कसं बनवायचं? मॅरीनेशन साठी काय युज करावे, अशा खूप सार्‍या अडचणी येतात . सर्वात मोठी अडचण म्हणजे तंदुरी चिकन घरी ओव्हन नसताना कसे बनवायचे कारण तंदुरी चिकन ओवन मध्ये लवकर बनवता येते.  परंतु ओवन नसताना तंदुरी चिकन कसे बनवायचे.

चला तर मग या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला हॉटेल स्टाईल मध्ये तंदुरी चिकन कसं बनवायचं हे सांगेल.  या सोबतच ज्यांच्या घरी ओवन आहे त्यांनी ओवन मध्ये तंदुरी चिकन कसे बनवायचं आणि ज्यांच्याकडे ओवन नाहीये त्यांनी गॅस वरती पॅनमध्ये तंदुरी चिकन कसे बनवायचं हे देखील सांगेल . या सोबतच तंदुरी चिकन सोबत लाल चटणी आणि हिरवी चटणी कशी तयार करायची हे देखील सांगेल. लाल आणि हिरवी चटणी तंदुरी चिकन सोबत खूप छान लागते.

तंदूर चिकन बनवण्यासाठी लागणारी सामग्री Ingredients of chicken Tandoori

  • अर्धा किलो चिकन मेडियम साईचे चिकन तुकडे
  • मोहरीचे तेल आवश्यकतेनुसार
  • बटर आवश्यकतेनुसार
  • आद्रक दोन इंच अद्रक चा तुकडा
  • लसन 15 te 16 सोलून
  • काळीमिरी  एक चमचा
  • विलायची मिक्सर मधून बारीक करून
  • कस्तुरी मेथ एक चमचा बारीक रफ करून
  • कोथिंबीर चवीनुसार
  • दही अर्धी वाटी
  • लिंबू एक
  • हिरवी मिरची दोन
  • काश्मिरी लाल मिरची तीन ते चार
  • लाल मिरची पावडर दोन चमच
  • विनेगर एक चमचा
  • गरम मसाला दोन चमचे
  • चाट मसाला दोन चमचे
  • मिट चवीनुसार

तंदूर चिकन बनवण्याची कृती How to make Tandoori Chicken

तंदुरी चिकन बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम विकत आणलेले चिकन हे स्वच्छ धुऊन घ्यावे लागेल.  तंदुरी चिकन बनवण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचे चिकन वापरावे ? तंदुरी चिकन बनवण्यासाठी आपण लेग पीस, थाय आणि चेस्ट या सर्व प्रकारचे चिकन वापरू शकतो. आज आपण लेग पीस आणि थाय पासून तंदुरी चिकन बनवायचे कसे हे पाहूया.

Step 1

आपण घेतलेले चिकन कसे मॅरीनेट करायचे?  कसे कट करायचे?  हे देखील आपण या रेसिपी मध्ये पाहूया.  सर्वात प्रथम आपण धुवून घेतलेले चिकनचे पीस स्वच्छ करून घ्यावे.  त्यावरती चिकन लेग पीस ला चाकूने कट मारावे सर्वात खाली चिकन लेग पीस ला पेक्षा एक कट मारावा .हे कट आपण मॅरीनेशन चांगले होण्यासाठी व चिकन मध्ये पूर्ण मसाले मुरण्यासाठी करतो . चिकन तंदुरी मध्ये चिकन पीस हे कट करणे महत्त्वाचे आहे , कारण मॅरीनेशन त्या मध्ये छान मुरते.

   चिकन पीस ला कट केल्यानंतर आपण तंदुरी चिकन बनवण्यासाठी फर्स्ट मॅरीनेट  करून घेऊया.  तंदुरी चिकन बनवण्यासाठी आपल्याला चिकनला दोन वेळेस मॅरीनेट  करावे लागते त्यामध्ये फर्स्ट मॅरिनेशन मध्ये बेसिक मसाले लावले जातात . सेकंड मॅरिनेशन मध्ये चिकन तंदुरी मसाले लावून चिकन रेस्ट करण्यासाठी ठेवले जाते.

Step 2

चिकन फस्ट मॅरिनेशन साठी  चिकन एका बाउल मध्ये घ्या. चिकनच्या पीस वरती चवीनुसार मीठ,  दोन चमचे लिंबूचा रस ,  दोन चमचे अद्रक आणि लसूण पेस्ट ,  एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर हे सर्व मसाले हाताने चिकनच्या पीस वरती छान असे लावून घ्या.  जेणेकरून सर्व मसाले चिकनच्या पीस मध्ये गेले पाहिजेत हे मसाले लावत असताना आपण कट मारलेला चिकन वरती कट मध्ये सुद्धा ते मसाले  घालून घ्या. अशाप्रकारे चिकनचा फर्स्ट मॅरिनेशन झाले आहे.  चिकन फस्ट मॅरीनेशन नंतर मिनिमम एक तासासाठी रेस्ट वर ठेवा.

रेस्टॉरंट मध्ये चिकन मॅरीनेट करून मिनिमम पाच ते सात तास ठेवतात जर तुम्हाला शक्य असेल तर , फर्स्ट मॅरिनेशन करून तुम्ही सुद्धा चिकन पाच ते सात तास ठेवा.  त्यामुळे चिकनला एक वेगळीच चव येते ,जर हे शक्य नसेल तर कमीत कमी एक तास तरी चिकन मॅरीनेट करून राहू द्या.

एक तास झाल्यानंतर आपल्याला फर्स्ट मॅरिनेशन केलेल्या चिकनला दुसऱ्या वेळेस मॅरिनेशन  करायचा आहे. त्यासाठी आपल्याला दही बनवून घ्यावे लागेल . हे दही आपल्या नॉर्मल दही पेक्षा थोडं वेगळं असेल, ते कसे तयार करायचे हे पहिले तुम्हाला सांगेल. दही तयार करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या रेगुलर एक वाटी दही घ्या .

 एका बाऊल वरती कॉटन चा कपडा ठेवा.  त्यामध्ये हे एक वाटी दही टाका. या कॉटनच्या कपड्यांमधून दही मधले जास्तीचे पाणी निघून जाईल.  तसंच ते दही अर्धा तासासाठी चाळणीमध्ये ठेवा यामधून दह्यामध्ये असलेलं जास्तीचे सर्व पाणी निघून जाईल. अर्ध्या तासानंतर पाहिल्यानंतर आपल्याला हे दिसून येईल की दही एकदम घट्ट झालं असेल.  त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पाणी अवशेष नसेल.

Step3

तंदुरी चिकन साठी चिकन दुसऱ्या वेळेस मॅरीनेट करण्यासाठी लागणारे कृती आपण पाहूया.  दुसऱ्या मॅरीनेशन साठी सर्वात प्रथम एक छोटी कढाई गॅस वरती ठेवा . त्यामध्ये दोन चमचे मोहरीचे तेल टाका . तेल गॅस वरती चांगले गरम होऊ द्या,  जेणेकरून यामधून धूर येईल यामुळे तेलामध्ये असलेला कच्चेपणा निघून जाईल.  यानंतर तेल थोडे थंड होऊ द्या.

 आपल्याला तेल थोडे थंड करायचे आहे , तेल एकदम थंड करायचे नाहीये यानंतर या तेलामध्ये काश्मिरी लाल मिरची एक चमचा टाकून सतत हलवत रहा .यामुळे मिरची पावडर चा एक छान कलर तेलामध्ये उतरेल असे केल्यामुळे कुठलाही प्रकारचा खाण्याचा कलर आपल्याला तंदुरी चिकन मध्ये वापरायची गरज पडणार नाही.

काश्मिरी लाल मिरची पावडर मुळे तेलाचा कलर चेंज झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या . व ते एका बाऊलमध्ये टाकून घ्या.  त्यामध्ये एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाका, काश्मिरी लाल मिरची थोड्या वेळासाठी गरम पाण्यामध्ये भिजत घाला. . त्यानंतर त्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट तयार करून घ्या . आणि ती पेस्ट बाऊलमध्ये एक चमचा  मिक्स करून घ्या.

  पेस्ट आवश्यक असेल तर तुम्ही घाला , नाहीतर ही ऑप्शनल सुद्धा आहे .काश्मिरी लाल मिरचीचा पेस्टमुळे तंदुरी चिकनला कलर खूप छान येतो. आणि ही तिखट सुद्धा नसते त्यामुळे शक्य असेल तर हे नक्की घाला. एक चमचा धने पावडर,  एक चमचा जिरा पावडर , अर्धा चमचा मीठ , अर्धा चमचा चाट मसाला , अर्धा चमचा गरम मसाला,  अर्धा चमचा कस्तुरी मेथी बारीक करून ,आणि एक छोटा अर्धा चमचा विलायची पावडर आणि आपण जे बनवलेले दही ते दही यामध्ये टाकून मिक्स करा.

Step 4

    हे सर्व मसाले छान मिक्स करून घ्या . जेणेकरून दह्यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ  राहू नये. हे सर्व मसाले एक जीव करून घ्या. मसाले एकजीव झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तंदुरी वाला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे. इंदुरी चिकन मध्ये एक वेगळा फ्लेवर असतो तो म्हणजे स्मोकी फ्लेवर.  तंदुरी चिकन आपण तंदूर मध्ये बनवतो त्यामुळे धुराचा त्यात वास लागतो , त्यामुळे कोळसावर बनवायला सारखे तंदुरी चिकन लागते .

आपण तंदुरी चिकन हे घरी पॅनमध्ये बनवत असल्यामुळे त्याला कोळसाचा स्मोकी फ्लेवर लागणार नाही . जर आपल्याला तंदुरी चिकनला स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला या मॅरीनेशनलाच स्मोकी फ्लेवर देता येईल.  तो कसा तर या मॅरीनेशनमध्ये एक वाटी ठेवून , त्यामध्ये लाल झालेला जळता कोळसा घ्या . त्यावरती एक अर्धा चमचा तूप घालून घ्या . यामुळे कोळसातून भरपूर प्रमाणात धूर बाहेर पडेल.

  धूर येताच हे मॅरीनेशन एका झाकणाने झाकून घ्या.  याने मॅरीनेशनला स्मोकी फ्लेवर येईल वरती झाकण हे कमी वेळासाठी ठेवा.  म्हणजे कमीत कमी एक ते दोन मिनिटांसाठी यापेक्षा जास्त वेळ जर आपण स्मोक मॅरिनेशनला दिला तर मॅरीनेशन चवीला कडसर होईल.  त्यामुळे कमी वेळ स्मोक मॅरिनेशनला द्या . आता एक मिनिटानंतर झाकण काढून घ्या.

यावेळेस मॅरीनेशन मसाला एक वेळेस टेस्ट करून घ्या.  त्यामध्ये मीठ तिखट बरोबर आहे का ? जर कमी जास्त असेल तर ते बॅलन्स करून घ्या . आपल्या आवश्यकतेनुसार तिखट आणि मीठ टाका यानंतर फर्स्ट मॅरिनेशन.  केलेल्या चिकन घ्या. आता फर्स्ट मॅरिनेशन करून चिकनला एक तास झाला आहे . तुम्ही पाहिलं असेल तर यामधून एक्स्ट्राचं पाणी चिकनने सोडला आहे . आपण मॅरिनेशन करताना चिकन मध्ये लिंबू आणि मिठाचा वापर केला होता,  त्यामुळे चिकन पाणी सोडत. तुम्ही या चिकन मधून हे जास्तीचे पाणी काढून टाकून फेकून द्या . व चिकनचे पीस ला आपण बनवलेलं मॅरीनेशन मसाला लावा.

चिकन वरती आपण बनवलेले मॅरिनेशन . हे हळुवार हाताने चांगले लावून घ्या . आपण कट मारलेले चिकन मध्ये सुद्धा मॅरिनेशन बोटाने लावून घ्या , जेणेकरून हे मॅरिनेशन चिकनच्या आर ओ आर जाईल.  चिकन मॅरीनेशन झाल्यानंतर परत चिकन अर्धा तासासाठी रेस्ट ला राहू द्या.

 आता आपलं चिकन पूर्णपणे मॅरीनेट झाले आहे.  एक वेळेस चिकन मॅरीनेट झाले की त्याचे भरपूर पद्धतीने चिकन तंदुरी बनवू शकतो.  जसं की गॅस वरती कढईमध्ये , पॅनमध्ये , कुकरमध्ये , ओवन मध्ये किंवा तंदुरी मध्ये तर आपण गॅस वरती पॅनमध्ये चिकन तंदुरी कशी तयार करायची हे पाहूया यासोबतच ओव्हनमध्ये सुद्धा पाहूया.

Step 5

चिकन तंदुरी करण्यासाठी एक पॅन गॅस वरती मिडीयम फ्लेम वरती ठेवून द्या. त्यानंतर यामध्ये दोन चमचे तेल टाकून थोडं गरम करून घ्या.  आपल्याला चिकन तंदुरी बनवायचे असल्यामुळे गॅसची फ्लेम कमी ठेऊ नका. कारण आपल्याला चिकन तंदुरी ही हाय फ्लेम वरती बनवायचे आहे . किंवा मिडीयम फ्लेम वरती सुद्धा बनवू शकता.  जर आपण गॅसची फ्लेम कमी ठेवली तर चिकन तंदूर होणार नाही . तर ते शिजले जाईल .आणि चिकन मधून पाणी बाहेर येईल.

 त्यामुळे चिकन तंदुरी बनवण्यासाठी आपण गॅसची फ्लेम सतत जास्त ठेवणार आहात . पॅनमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये सुटसुटीत दोन दोन चिकनचे पीस ठेवून द्या.  त्यावरती कुठल्याही प्रकारचे झाकण ठेवू नका.  चिकनचे पीस पॅन मधून सतत पलटू नका . एक साईडने चिकनचा फेस हे कमीत कमी पाच मिनिटांसाठी पॅनमध्ये राहू द्या .  जर तुम्ही चिकन तंदुरी बनवत असताना चिकन पीस हा सारखं पलटत राहिला तर चिकन पॅनला चिटकेल , त्यामुळे मॅरीनेशन तेलामध्ये पसरल .

हे टाळण्यासाठी एका बाजूला चिकन कमीत कमी पाच मिनिटे चांगले भाजू द्या.  त्यानंतर अलगद हाताने चिकनची साईट पलटून घ्या.  व सेम तसेच दुसऱ्या बाजूने सुद्धा चिकन तंदूर होऊ द्या.  चिकन शिजायला थोडा वेळ लागतो.  त्यामुळे असेच पाच मिनिटांच्या फरकावरती चिकन तंदुरी बाजू बदलत रहा . कमीत कमी 25 मिनिटांमध्ये चिकन तंदुरी ही गॅस वरती पॅनमध्ये चांगल्या प्रकारे तयार होईल.

Step 6

चिकन तंदुरी ओवन मध्ये कशी तयार करायची यासाठी ओवन मधील बेकिंग पॅड घ्या.  त्यावरती चिकन ठेवा व ते 170 डिग्री हिट केलेल्या ओव्हनमध्ये बेकिंग पॅड ओव्हन मध्ये ठेवून द्या.  हे सुद्धा 25 मिनिटांसाठी ओव्हन मध्ये ठेवून द्या. चिकन तंदुरी बनण्यासाठी पाच मिनिटे शिल्लक असतानाच बटरचा चिकन पीस वरती थोडे फिरवून घ्या.  यामुळे चिकनला एक वेगळंच लुक येईल.  चिकन तंदुरी ही हॉटेल स्टाईल मध्ये दिसेल. चिकन तंदुरी वर बटर लावून झाल्यानंतर परत पाच ते सात मिनिटांसाठी चिकन ओवन मध्ये व पॅनमध्ये ठेवून द्या.  हे झाल्यानंतर चिकन तंदुरी तयार असेल.

अशाप्रकारे आपली चिकन तंदुरी तयार आहे.

चिकन तंदुरी आपण कशा सोबत सर्व्ह करायची How To Serve Chicken Tandoori

चिकन तंदुरी ही तंदुरी रोटी सोबत खायला सर्वांना आवडते.  व सिम्पल हिरवी चटणी आणि लाल चटणी सोबत सुद्धा तंदुरी चिकन हे खूप चविष्ट लागते . याच आर्टिकल मध्ये मी तुम्हाला लाल चटणी आणि हिरवी चटणी कशी तयार करायची हे देखील सांगणार आहे.

हिरवी चटणी बनविण्यासाठी लागणारी सामग्री Ingredients of Green Chatan

  • फ्रेश कोथिंबीर एक वाटी
  • पुदिन्याची पाने अर्धी वाटी
  • कांदा एक मेडियम साईज ने कट केलेला
  • लसन पाकळ्या तीन ते चार सोलून
  • अद्रक अर्धा इंच अद्रक मिडीयम साईज ने कट करून
  • हिरव्या मिरच्या तीन ते चार  कट करून
  • एक चमचा चिंच
  • एक चमचा गूळ
  • एक चमचा जिरा पावडर
  • मीठ आवश्यकतेनुसार
  • बर्फ आवश्यकतेनुसार
  • पाणी आवश्यकतेनुसार

हिरवी चटणी बनवण्यासाठी ची कृती How to Make Green CHatani

तंदुरी चिकन सोबत आवडीने खाणारी हिरवी चटणी बनवण्यासाठी एक वाटी कोथिंबीर,  एक वाटी फ्रेश पुदिन्याची पाने , अर्धा इंच अद्रक चा तुकडा , तीन ते चार लसणाच्या पाकळ्या सोलून, , दोन ते तीन हिरव्या मिरच्या , एक चमचा चिंच , एक चमचा लिंबू , एक चमचा जिरा पावडर,  मीठ चवीनुसार , दोन बर्फाचे मोठे तुकडे आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सर मधून बारीक करून घ्या .

बर्फाचा तुकडा यासाठी टाकायचा की मिक्सर मधून बनवत असताना मिक्सरचा तापमान वाढतो . त्यामुळे चटणीचा कलर हा बदलू शकतो , परंतु बर्फ वापरल्यामुळे चटणीला एकदम हिरवा कलर येतो . त्यामुळे बर्फ नक्की वापरा अशा प्रकारे आपली तंदुरी चिकन सोबत खायची हिरवी चटणी तयार होईल.  हे वाटण मिक्सरमधून बारीक करून घ्या एकदम सॉफ्ट असं बेटर झाल्यानंतर ही हिरवी चटणी तयार असेल.

लाल चटणी तयार करण्यासाठी ची सामग्री Ingredients of Red Chatani

  • काश्मिरी लाल मिरची 15 ते 20
  • फ्रेश कोथिंबीर
  • पुदिनाची पानं
  • चिंच चार चमचे
  • गुळ एक चमच
  • जिरा पावडर एक चमच
  • हिरवी मिरचीतीन ते चार
  • आवश्यकतेनुसार मीठ
  • तेल दोन चमचे
  • पाणी आवश्यकतेनुसार

लाल चटणी बनवण्यासाठी ची कृती How to Make Laal Chatani

तंदुरी चिकन सोबत लाल चटणी व हिरवी चटणी ही आवर्जून खाल्ली जाते.  यामुळे तंदुरी चिकनची टेस्ट ही खूप चांगली येते.  लाल चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम काश्मिरी लाल मिरची 15 ते 20 गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवा.  या  .मिरची कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटे गरम पाण्यामध्ये ठेवा . त्यामुळे या सॉफ्ट होतील व मिक्सर मधून याची बारीक पेस्ट निघेल . काश्मीर लाल मिरच्या मऊ झाल्यानंतर त्यामधून सर्व बी काढून घ्या.

मिरच्या मधून बी काढून घेतल्यानंतर या काश्मिरी लाल मिरच्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला त्यामध्ये थोडीशी फ्रेश कोथिंबीर ,थोडीशी फ्रेश पुदिन्याची पाने , तीन ते चार चमचे चिंच,  एक चमचा गूळ,  एक चमचा जिरा पावडर,  दोन ते तीन हिरवी मिरची, अर्धा चमचा मीठ , दोन चमचे तेल व थोडेसे पाणी घालून हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या .याची बारीक पेस्ट झाली असेल.

अशा प्रकारे आपली तंदुरी चिकन सोबतची खायची लाल चटणी तयार आहे.

तंदुरी चिकन रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि तंदुरी चिकन रेसिपी ही घरी एक वेळेस तुम्ही नक्की बनवून पहा सर्वांना खूप आवडेल.

FAQs

तंदुरी चिकन खाणे आरोग्यासाठी चांगले आहे का? Is tandoori chicken healthy to eat?

हो तंदुरी चिकन हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे . कारण तंदुरी चिकन मध्ये कमी फॅट आणि कमी कॅलरीज आहेत.  त्यामुळे ज्या व्यक्तींना आपले वजन कमी राखायचे आहे व सोबतच चिकनची टेस्ट पण घ्यायची आहे. त्यांच्यासाठी तंदुरी चिकन हे बेस्ट आह. चिकन तंदुरी मध्ये प्रोटीनचे प्रमाण सुद्धा खूप जास्त असते.

तंदुरी चिकन मसाले दार असते का? Is the tandoori chicken spicy?

तंदुरी चिकन हे मसालेदार आहे.  कारण तंदुरी चिकन बनवण्यासाठी खूप सारे मसाल्याचे युज केला जातो , व ते मातीच्या ओव्हनमध्ये शिजवले जाते . सोबतच मसालेदार आणि स्मोकी फ्लेवर त्याला दिला जातो. अशा प्रकारे तंदुरी चिकन हे सुगंधी आणि चवदार चिकन आहे . अशा प्रकारे शिजवल्यानंतर चिकनला मऊपणा येण्यासाठी परत ते भाजले जाते .यामुळे तंदुरी चिकन हे एकदम मसालेदार आणि चवदार आहे.

चिकन मध्ये तंदुरी चिकन चांगले आहे की ग्रील चिकन? Which is better tandoori or grill?

ग्रील चिकन पेक्षा तंदुरी चिकन हे जास्त चांगले आहे.  कारण तंदुरी चिकन बनवताना पारंपारिक पद्धतीचा वापर केला जातो ,त्यामुळे तंदुरी चिकन हे एकदम चवदार आणि शिजलेले असते.


तंदुरी चिकन इतके चविष्ट का असते? Why is tandoori chicken so tasty?

तंदुरी चिकन हे खूप चविष्ट आहे कारण यामध्ये भरपूर प्रमाणात मसाले एकत्र करून चिकनला मॅरीनेट केले जाते.  व ते ओव्हनमध्ये शिजवले जाते . त्यानंतर त्याला भाजले जाते .यामुळे याची चव खूप चांगल्या प्रकारे येते.  जर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे तंदुरी चिकन इतके चविष्ट का बनते,  तर तुम्ही वरी दिलेली रेसिपी पूर्ण वाचा. समजून जाईल की तंदुरी चिकन हे इतके चविष्ट का असते.

तंदुरी चा फायदा काय? What is the benefit of tandoori?

तंदुरी चिकन मध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन आढळतात .सोबतच प्रथिने सुद्धा खूप जास्त आढळतात. त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी तंदुरी चिकन हे खूप चांगले आहे. सोबतच चिकन मध्ये कॅलरीज कमी असल्यामुळे हे वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे .अशा पद्धतीने तंदुरी चिकनचे खूप सारे फायदे आहेत.

Leave a Comment