चिकन दम बिर्याणी रेसिपी

Chicken Dam Biryani Recipe in Marathi

चिकन दम बिर्याणी रेसिपी

चिकनच्या आपण खूप  सार्‍या रेसिपी बघतो,पण चिकन दम बिर्याणी हे चिकन लव्हर खूप आवडीने खातात. हॉटेलला गेल्यानंतर बहुतांश लोकांना ही चिकन दम बिर्याणी खायला आवडते. चिकन दम बिर्याणी ही बनवायला खूप सोपी आणि कमी सामग्री मध्ये आणि कमी वेळेमध्ये तयार होते.

बहुतांश लोकांची तक्रार ही असते की घरी चिकन दम बिर्याणी बनवली तर ती कोरडी वाटते, ड्राय होते मी आजच्या या रेसिपीमध्ये तुम्हाला अशा काही टिप्स सांगेन जेणेकरून तुम्ही घरी बनवलेली चिकन दम बिर्याणी ही एकदम हॉटेल स्टाईल मध्ये होईल .ती ड्राय कोरडी नसेल तर मस्त हॉटेल सारखी असेल. चिकन दम बिर्याणी ही चवीला एकदम छान लागते. Immediate घरी पाहुणे आले असतील तर चिकन दम बिर्याणी ही जेवणामध्ये बनवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. नॉनव्हेज लव्हर याला खूप आवडीने खातात आणि आपल्याला बनवायला ही सोपी आहे चला तर मग जाणून घेऊया चिकन दम बिर्याणी रेसिपी.

चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी लागणारी सामग्री

Ingredients of chicken dam biryani

  • अर्धा किलो राईस बिर्याणी राईस
  • अर्धा किलो चिकन मध्यम आकाराचे चिकनचे तुकडे
  • लसूण पाकळ्या सोलून
  • तेल आवश्यकतेनुसार
  • तूप दोन ते तीन चमचे
  • एक मोठा अद्रक चा तुकडा बारीक कट करून
  • काश्मिरी लाल तिखट तीन ते चार चमचे
  • गरम मसाला चार ते पाच चमचे
  • धने पूड दोन ते तीन चमचे
  • हळद दोन चमचे
  • घरगुती लाल मिरची पावडर तीन ते चार चमचे
  • पुदिनाची पानं बारीक  चिरून
  • कोथिंबीर बारीक चिरून
  • दही अर्धी वाटी  ताज
  • कांदे पाच ते सहा मेडियम साईजचे कांदे, लांब आकाराचे बारीक काप करून
  • लवंग ४,५
  • काळी मिरी ४,५
  • वेलदोडा १,२
  • चक्रीफुल १
  • विलायची ३,४
  • मोठी विलायची १,२
  • तेज पत्ता १,२
  • दालचिनी २ इंच
  • शहाजिरे एक चमचा
  • टोमॅटो १
  • लिंबू १
  • मीठ चवीनुसार
  • पाणी आवश्यकतेनुसार

चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी लागणारा कालावधी

चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी कमीत कमी 45 मिनिट लागतात .या पाऊण तासांमध्ये आपली चिकन दम बिर्याणी ही तयार होईल या 45 मिनिटांमध्ये पाच मिनिट हे चिकन तेलामध्ये परतून घेण्यासाठी लागतील, 30 मिनिट हे चिकनला दम देण्यासाठी लागतील व शेवटचे दहा मिनिट हे झाकण लावून चिकन वाफेवर शिजण्यासाठी लागते .अशा प्रकारे 45 मिनिटांमध्ये चिकन शिजल याची आपली चिकन दम बिर्याणी तयार होईल खूप कमी वेळामध्ये खूप चविष्ट चिकन दम बिर्याणी तयार होते. चला तर मग जाणून घेऊया चिकन दम बिर्याणी बनवण्याची कृती.

चिकन दम बिर्याणी बनविण्याचे कृती खालील प्रमाणे

How to make chicken dam biryani recipe

Step 1 चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी सर्वप्रथम बाजारातून विकत आणलेले चिकन हे धुऊन घ्या. चिकनचे पीस हे मोठे असतील तर मीडियम साईज मध्ये कापून चिकनचे पीस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावेत चिकनचे पीस दोन-तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावेत.

        जर आपण अर्धा किलो चिकनची दम बिर्याणी बनवत असणार तर त्याच प्रमाणात बिर्याणी राईस सुद्धा घेतला पाहिजे ,चिकन अर्धा किलो वापरत असाल तर अर्धा किलो बिर्याणी राईस वापरा. एक किलो चिकन असेल तर एक किलो हेच प्रमाण हॉटेलमध्ये बिर्याणी बनवताना युज केले जाते.राईसच जर प्रमाण जास्त झाले तर बिर्याणी ही कोरडी होते. त्यामुळे चिकनचे प्रमाण आणि राईस प्रमाण हे सेम घ्यावे.

अर्धा किलो राईस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या यानंतर या राईस मध्ये पाणी घालून साईटला ठेवा तोपर्यंत चिकन मॅरीनेट करून घ्या.

चिकन मॅरीनेट करण्यासाठी काय लागेल हे पुढील प्रमाणे

 Step 2 चिकन मॅरीनेट करण्यासाठी सर्वप्रथम अर्धा किलो स्वच्छ धुतलेले चिकन घ्या ,यामध्ये दोन चमचे अद्रक लसणाची पेस्ट घाला यानंतर एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर ,दोन चमचे गरम मसाला ,एक चमचा धना पावडर ,दोन ते तीन चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद ,अर्धा चमचा मीठ ,चार ते पाच चमचे दही ,दोन ते तीन चमचे बिर्याणी मसाला हे सर्व पदार्थ चिकन मध्ये घालून चिकन मिक्स करून घ्या.

          आपण चिकन मध्ये टाकलेले सर्व मसाले चिकनच्या प्रत्येक पीस ला छान असे लावून घ्या. जितका जास्त वेळ चिकन मॅरीनेट करून ठेवू शकाल तितका जास्त वेळ ठेवा ,जर वेळ असेल तर चिकन मॅरीनेट करून सात ,आठ तासापूर्वी ठेवा. जर वेळ नसेल गडबडीत बनवायचं असेल तरी काही हरकत नाही चिकन मॅरीनेट करून दहा ते पंधरा मिनिट ठेवले तरी चालेल, परंतु चिकन मॅरीनेट करून जास्त वेळ ठेवले तर बिर्याणीला वेगळीच चव येते.

  Step 3   चिकन मॅरीनेट करून ठेवल्यानंतर चिकन राईस बनवून घेऊ या ,चिकन राईस बनवण्यासाठी तांदूळ घेतल्यापेक्षा थोडा जास्त पाणी घ्या, यासाठी एक मोठे पातेले गॅस वरती ठेवून त्यामध्ये दोन, अडीच लिटर पाणी टाका या पाण्यामध्ये एक दोन चमचे मीठ, एक चमचा तूप, एक चक्रीफुल, एक ते दोन तमालपत्र म्हणजेच तेच पत्ता ,अर्धा चमचा शहाजीरा ,एक वेलदोडा ,चार काळी मिरी ,चार लवंग, तीन ते चार विलायची, एक मोठी विलायची, एक दालचिनी टाकून मिडीयम फ्लेम वरती पाणी गरम होऊ द्या.

              एक पाच मिनिट नंतर पाणी चांगले उकळल्यानंतर त्यामध्ये भिजत ठेवलेला राईस टाका, या पाण्यामध्ये मीठ गरजेपेक्षा थोडे जास्त वापरा कारण ,आपण हा राईस मॅक्सिमम 72%, 80% शिजवणार आहात, त्यामुळे उरलेले पाणी हे आपण टाकून देणार आहोत ,म्हणून मीठ कमी पडता कामा नये, यामुळे गरजे पेक्षा थोडे जास्त मीठ घालून दम बिर्याणी राईस शिजवून घ्यावा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये राईस टाका ,यावरती झाकण ठेवून द्या.या राईसला सारखं चमचाने हलवून पाहू नका, कारण सारखं हलवला असता राईसचे तुकडे होऊ शकतात,‌ त्यामुळे बिर्याणी दिसायला उत्तम दिसणार नाही म्हणून राईस शिजत असताना त्यामध्ये सतत चमचा फिरवू नये .जेणेकरून बिर्याणी राईस हा लांब लांब राहील बिर्याणी राईस जास्त वेळ पण शिजवू नये यामुळे राईस चिकट होईल म्हणून राईस पाण्यामध्ये घातल्यानंतर कमी फ्लेम वरती जास्तीत जास्त दहा मिनिट झाकण लावून ठेवावा .

दहा मिनिटे नंतर राईस हा साठ ते सत्तर टक्के शिजला असेल तर तो अलगद चाळणी वरती काढून घ्यावा यामध्ये थोडाही पाणी बाकी राहू नये. जर या राईस मध्ये पाणी राहिलं तर राईस गुळगुळीत आणि चिकट होईल त्यामुळे आपण घरी युज करतो ती चाळणीमध्ये हा राईस ओतून याच्या मधलं पूर्ण मॉइश्चर, पाणी काढून साईडला घ्यावे व राईस थोडा वेळ हवेला ठेवावा राईस मधील पाणी निघेपर्यंत आपण बिर्याणी बनवण्याची सुरुवात करूया.

 Step 4   बिर्याणी बनवण्यासाठी पाच ते सहा मिडीयम आकाराचे कांदे हे लांब स्लाईस मध्ये कट करून घ्या. त्यानंतर यामध्ये एक कांद्याचं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक पेस्ट करून घ्या व दुसरा एक कांदा जो आपण कट करून घेतला आहे ,तो भरपूर तेलामध्ये लाल फ्राय  करून घ्या. लाल फ्राय म्हणजे एकदम ड्राय कुरकुरीत करून घ्या .तो फ्राय केलेला कांदा तेलाचा बाहेर काढून थंड करायला ठेवा, यानंतर या तेलामध्ये उरलेले तीन कांद्याचे काप घालून लाल होईपर्यंत भाजून घ्या.

हे कांदा लाल होत आल्यानंतर आपण बनवलेले कांद्याची पेस्ट घालून घ्या. लांब कांदा युज करत असताना कांद्याची पेस्ट का टाकायची याचं कारण असं आहे की बहुतांश लोकांची तक्रार असते बिर्याणी ही कोरडी होते, जर यामध्ये ग्रेव्ही करून कांदा घातला तर हा मसाला वाढतो त्यामुळे बिर्याणी राईस आणि चिकन एकजीव होतं . 

 Step 4  त्यामुळे एक ते दोन कांद्याची पेस्ट व एक दोन कांदे हे लांब कट करून तेलामध्ये फ्राय करून घ्या त्यानंतर हा टाकलेला कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या. नॉनव्हेजची चव ही नॉनव्हेज बनवताना वापर केलेल्या मसाल्यावरती व कांद्याच्या फ्लेवर वरती असते त्यामुळे कांदा युज करताना काळजी घ्या. कांदा हा कच्चा राहू नये. त्यामुळे कांदा चांगला वेळ कढाई मध्ये परतून घ्या त्याचा कलर ब्राऊन रेड झाला पाहिजे .

    कांदा रेड असा झाल्यानंतर त्यामध्ये मॅरीनेट केलेले चिकन घालून पाच मिनिट ते चिकन कांद्याच्या मसाला सोबत परतत रहा , परतत असताना यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्या. यामुळे कांदा लवकर शिजला जाईल. चिकन आपण आधीच मॅरीनेट करून घेतलं असल्यामुळे त्याचा कलर हा रेड झाला असेल यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची बारीक कट केलेली पाने घालून घ्या व पाच मिनिट परता हे परतत असताना त्यामधून तेल निघत असेल तेव्हा त्यामध्ये थोडं टोमॅटो घालून घ्या.

     टोमॅटो चांगला शिजल्या नंतर ते परतून घ्या त्यावरती पाच मिनिटे झाकण लावून ठेवा जेणेकरून कांदा टोमॅटो मसाला चिकन मध्ये अरोअर जाईल त्यामुळे कुठलाही मसाला कच्चा राहणार नाही व मसाल्याचे फ्लेवर हे चिकन मध्ये खूप चांगल्या प्रकारे उतरते जेवढ्या चांगल्या प्रकारे फ्लेवर उतरतील तेवढेच चांगल्या प्रकारे बिर्याणीची टेस्ट व कलर येईल त्यामुळे याला झाकण लावून पाच मिनिट ठेवा.

Step 5 पाच मिनिट नंतर झाकण उघडून पाहिले असता तुम्हाला बिर्याणी मधून तेल बाहेर पडलेले दिसेल असं असतात त्यामध्ये आपण 70 टक्के शिजलेला राईस टाका. तो चांगल्या साईडने बिर्याणीच्या राईस वरती परतून ठेवा जेणेकरून पूर्ण चिकन भांड्याच्या तळाला व त्याच्यावरती राहीलेला पूर्ण राईस त्यावरती ठेवल्यानंतर त्यावरती एक चमचा तूप पसरून घ्या .थोडीशी कोथिंबीर ,पुदिन्याची पानं व कोमट दुधामध्ये दोन ते तीन केशर ची पाने घालून ठेवा व ते दूध या बिर्याणी वरती टाका.

     यामुळे बिर्याणी राईस हा सॉफ्ट होईल केशर चा फ्लेवर आणि टेस्ट बिर्याणीला लागेल व आपल्या राईस चा कलर देखील पिवळसर छान येईल .  जर तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही खाण्यासाठी युज केलेला कलर हा दोन चमचे पाण्यामध्ये मिक्स करून घ्या. भातावरती गोल साईडने फिरवून घ्या यामुळे बिर्याणी मध्ये भरपूर कलर येतील .बिर्याणी मध्ये राईस थोडा लाल, पिवळा व स्वतःचा पांढरा असा राहील त्यामुळे बिर्याणी ही चांगली दिसेल . थोडा वेळ भांडे हे कमी फ्लेम वरती गॅस वरती ठेवावे कमीत कमी पाच मिनिटे तसेच राहू द्यावे.

 Step 6 पाच मिनिट भांड गॅस वरती कमी फ्लेम वरती ठेवलं असता यानंतर साईट वरच्या गॅसवर तवा हा चांगला गरम करून घ्या .तवा चांगला गरम  झाला असेल तर गॅसची फ्लेम कमी करून घ्या व तव्यावरती आपण बनवलेल्या बिर्याणीचे भांडे ठेवा त्यावर झाकण फिट बसेल असं ठेवा ,जेणेकरून बिर्याणी मधील तयार झालेली वाफ ही भांड्याच्या बाहेर येता कामा नये .

      असेच कमी फ्लेम वरती तव्यावरती हे भांडे 30 मिनिटासाठी ठेवा .30 मिनिटे राईसला दम दिल्यानंतर लगेच त्याचे झाकण उघडू नका. त्यानंतर गॅस बंद करा व परत पंधरा मिनिटे त्या भांड्यावरती झाकण घट्ट राहू द्या .पंधरा मिनिटे परत दम बिर्याणीला दम दिल्यानंतर तुम्ही झाकण उघडले असतात तुमची चिकन दम बिर्याणी ही तयार झाली असेल .

       यानंतर एका साईडने चमचा घालून चिकनचा पीस शिजला आहे का हे पहा .बिर्याणी मधील चिकन चा पीस मऊवार शिजला असेल तर बिर्याणी ताटामध्ये वाढण्यासाठी तयार झाली असेल. बिर्याणी खाण्यासाठी कोणताही वेळ काळ नसतो, नॉनव्हेज लव्हर बिर्याणी सकाळ ,दुपार ,संध्याकाळ उन्हाळी ,पावसाळी ,हिवाळी कधीही खाऊ शकतात तिची चव कधीही बदलत नाही .आणि अशा पद्धतीने बिर्याणी बनवली असेल तर तुमची बिर्याणी एकदम हॉटेल स्टाईल मध्ये तयार होईल अर्धा किलो चिकन ची बिर्याणी कमीत कमी चार माणसे आरामशीर पोट भरून खाऊ शकतात.

चिकन दम बिर्याणी कशा सोबत खायची

चिकन दम बिर्याणी खाण्यासाठी सोबत रायता बनवू शकता जर आवडत असेल तर नाहीतर चिकन बिर्याणी असेच खाऊ शकता चिकन दम बिर्याणी सोबत राहता खायचा असेल तर रायता बनवण्याची रेसिपी खालील प्रमाणे.

रायता रेसिपी

How to make Rayta Recipe

एक कांदा बारीक कट करून घ्या यानंतर एक काकडी एकदम बारीक पीस मध्ये कट करून घ्या यामध्ये चवीनुसार मीठ घ्या . कोथिंबीर बारीक कट करून टाका त्यानंतर एक अर्धा चमचा साखर, व चवीनुसार एक चुटकी भर लाल तिखट पावडर टाका हे मिक्सर छान असे मिक्स करा अशा पद्धतीने बिर्याणी सोबत खायचा रायता तयार आहे. झटपट आणि सोपा बिर्याणी सोबत राहता खूप चांगला लागतो तुम्ही देखील नक्की ट्राय करा.

FAQ

Which biryani is famous in world?
जगात कोणती चिकन बिर्याणी सर्वात जास्त फेमस आहे?

हैदराबादी बिर्याणी बिर्याणी हे सर्वात प्रसिद्ध चिकन रेसिपी मानली जाते खरोखरच प्रत्येक चिकन लव्हर ला बिर्याणी ही खूप आवडते भारतामध्ये बिर्याणीसाठी हैदराबाद हे प्रसिद्ध ठिकाण आहे हैदराबादी बिर्याणी सर्वात प्रसिद्ध मानली जाते आणि चवीला सुद्धा खूप चविष्ट आणि स्पायसी मानली जाते. हैदराबाद मध्ये तांदूळ आणि चिकन मध्ये चव तयार करण्यासाठी दम पद्धत वापरली जाते आणि या पद्धतीमुळेच हैदराबादी बिर्याणी हे सर्वात फेमस आहे मानले जाते.

चिकन दम बिर्याणी ही आरोग्यासाठी चांगली आहे का? Is Chicken Dum Biryani healthy?

चिकन दम बिर्याणी हे आरोग्यासाठी खूप चांगले आहे ,कारण यामध्ये विटामिन बी सिक्स (Vitamin B6),सेलेनियम जास्त प्रमाणात असते.विटामिन बी सिक्स(Vitamin B6)मुळे शरीरातील पचनक्रिया ही सुरळीत होते. व सेलेलियम मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आणि दुसरा उपयोग म्हणजे ज्या व्यक्तींना थायरॉईड चा प्रॉब्लेम आहे, त्यांचा थायरॉईड सुद्धा नियंत्रणात होतो .त्यामुळे चिकन दम बिर्याणी ही आरोग्यासाठी उत्तम आहे.

चिकन दम बिर्याणी मध्ये हाडे असतात का? Does dum biryani have bones?

चिकन दम बिर्याणी ही हाडांसाठी उत्तम आहे. कारण ती भात आणि चिकन बरोबर सोबत शिजवलेल्या हाडांना चव आणते आणि चिकन बिर्याणीची चव सुधारते त्यामुळे चिकन दम बिर्याणी मध्ये हाडाचे पीस वापरले जातात.

चिकन बिर्याणी आणि दम बिर्याणी मध्ये काय फरक आहे? What is the difference between chicken biryani and dum biryani?

सर्वप्रथम चिकन बिर्याणी आणि दम चिकन बिर्याणी मध्ये मेन डिफरन्स म्हणजे त्यांच्या किमती मध्ये खूप फरक आहे. चिकन बिर्याणी बनवत असताना आपण सर्व मसाले साईटला तळून घेऊन चिकन मध्ये लावतो परंतु दम बिर्याणी मध्ये असे नसूनही दम बिर्याणी मध्ये संपूर्ण भात मसाले चिकन बाकीच्या दाबाने शिजवले जातात ज्यामध्ये काजू कांदा याचा उपयोग केला जातो.

 

Leave a Comment