Mutton Carry Recipe In Marathi
Non-vegetarianआवडीने खाणाऱ्या सर्वांसाठी आज आपण जाणून घेऊया गावरान पद्धतीने मटन रेसिपी कशी तयार करायची. नॉनव्हेज मध्ये चिकन, मटण ,मासे असे अनेक पद्धतीचे नॉनव्हेज खाल्ले जाते. पण मटणाची चव ही दुसऱ्या कुठल्याच नॉनव्हेजला येत नाही, आणि मटण बनवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत पद्धती बदलल्या की मटणाची चव सुद्धा बदलते यामध्ये आपण मटन रस्सा ,मटन करी, मटणाची बिर्याणी ,मटणा चे कटलेट अशा अनेक पद्धतीने मटन खाण्याचा आस्वाद घेऊ शकतो यामध्ये मटणाची करी ही चवीला खूप चविष्ट असते.
हॉटेल स्टाईल मध्ये मटन करी भाजी घरी कमीत कमी वेळात प्रेशर कुकरमध्ये कशी तयार करायची हे आपण पाहूया बहुतांश लोकांचा असं म्हणणं असतं की मटन तयार करण्यासाठी खूप वेळ खर्च होतो तर चला तर आज आपण या आर्टिकल मध्ये कमीत कमी वेळामध्ये मस्त, रुचकर मटन करी भाजी कशी तयार करायची हे जाणून घेऊया.
मटन करी बनवण्यासाठी लागणारी सामग्री
Ingredients of mutton curry recipe
- अर्धा किलो मटण मिडीयम साईज चे पीस कट करून
- तेल आवश्यकतेनुसार
- तूप दोन ते तीन चमचे
- पाच-सहा कांदे लांब साईज मध्ये कट करून
- टोमॅटो तीन ते चार
- 14 ते 15 लसणाच्या पाकळ्या सोलून
- दोन इंच अद्रक चा तुकडा
- मिरच्या २
- दही एक वाटी
- तेज पत्ता एक ते दोन
- काळी मिरी एक चमचा
- जीरा एक चमचा
- शहाजीरा एक चमचा
- धना पावडर दोन चमचे
- गरम मसाला दोन चमचे
- मटन मसाला दोन चमचे
- लिंबू अर्धा कट करून
- चार मिरच्या लाल कलरच्या वाळलेल्या मिरच्या
- दालचिनी एक इंच
- मोठी विलायची एक
- छोटी विलायची पाच ते सहा
- लवंग एक चमचा
- कोथंबीर
- मीठ चवीनुसार
- लाल तिखट दोन चमचे
- काश्मिरी लाल तिखट एक चमचा
- हळदी पावडर दोन चमचे
- कस्तुरी मेथी एक चमचा
- पाणी आवश्यकतेनुसार
मटन तयार करण्यासाठी लागणारा कालावधी
मटन करी बनवण्यासाठी नॉर्मल नॉनव्हेज बनवण्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो परंतु या आर्टिकलमध्ये मी तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये मटन करी कशी बनवायची हे सांगेल.
मटन करी बनवण्यासाठी चा विधी How to make mutton curry recipe
Step 1
मटन करी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण विकत आणलेल्या मटन हे धुऊन घ्यावे. मटन धुत असताना एक काळजी घ्यावी ,मटण स्वच्छ पाण्याने धुत असताना त्यामध्ये एक चमचा मीठ व पाणी घालून धुवून घ्यावे. जेणेकरून मटण मधून कुठल्याही प्रकारचा वास येणार नाही मटण हे जास्त वेळेस धुवायची गरज नसते मटण एक ते दोन वेळेस धुतले तरी ते स्वच्छ निघते परंतु मटण धूत असताना मिठाचा वापर नक्की करा. मटन धुऊन घेतल्यानंतर त्याला एका चाळणी मध्ये काढून घ्या जेणेकरून त्यामधून सर्व पाणी निघून जाईल.
यानंतर सर्वात प्रथम आपण मटन मॅरीनेट करून घेऊया .मटन मॅरीनेट करण्यासाठी आपण स्वच्छ धुऊन घेतलेले मटण घ्या ,यामध्ये एक चमचा मीठ, एक चमचा हळद ,अर्धा लिंबाचा रस दोन ते तीन चमचे अद्रक लसूण पेस्ट, अर्धी वाटी दही घाला . हे सर्व मसाले मटणला काळजीपूर्वक लावून घ्या. जेणेकरून हा पूर्ण मसाला मटनच्या प्रत्येक पीसला चांगला लागला जाईल लिंबाच्या रसामुळे आणि दह्यामुळे मटणला सॉफ्टनेस येईल ,व चव सुद्धा चांगली येईल .हे मॅरीनेट केलेले मटण साईडला ठेवून घ्या ,दहा ते पंधरा मिनिटे शांत राहू द्या.
यानंतर मटन बनवण्यासाठी आपण पाच ते सहा मिडीयम साईजचे कांदे लांब आकारात कट करून घ्या कांदा कट करत असताना एक काळजी घ्या जास्तीत जास्त कांदा हा आपण बारीक कट करून घ्या. म्हणजे आपण जेव्हा मटन करी बनव तेव्हा कांदा हा लवकर शिजला जाईल जर तुम्ही कांदा कट करत असताना मोठे मोठे तुकडे केले तर त्याला वेळ लागेल. यानंतर तीन ते चार टोमॅटो घ्या, आपण घेतलेले टोमॅटो हे बारीक कट करून घ्या.
Step 2
यानंतर तीन ते चार लसणाचे गड्डा घ्या ,व तो सोलून घ्या .लसूण सोलण्याला खूप कालावधी लागतो त्यासाठी लसणाच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्या. एका बाऊलमध्ये टाका व त्यामध्ये गरम केलेलं थोडसं पाणी घाला व ते 15 मिनिटांसाठी भिजू द्या त्यानंतर लसणाच्या पाकळ्या लगेच सोलून निघते यासोबतच अद्रक चे दोन ते तीन तुकडे घ्या. अद्रक घेतल्यानंतर चाकूने आद्रक सोलून घ्या. पण मटन करी बनवत असताना किंवा कोणत्याही प्रकारचे Nn-veg बनवत असताना लसन आणि अद्रक चा प्रमाण जास्त वापरतो, कारण अद्रक आणि लसणमुळेच नॉनव्हेजला जास्त चव येते .
त्यामुळे आद्रक व लसूण जास्त प्रमाणात घ्या .अद्रक वरची साल ही काढून टाका व अद्रक छोट्या आकारात कट करून घ्या. सोबतच तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घ्या. मिरच्या जरी बारीक नाही करून घेतल्या तरी कट केलेल्या मिरच्या हे मटण शिजत पर्यंत चांगल्या शिजवून जातील त्यामुळे मिरच्या बारीक कट करून घ्या.
Step 3
मटन करी बनवण्यासाठी आता एक कुकर गॅस वरती मिडीयम फ्लेम वरती ठेवा, त्यामध्ये तीन ते चार मोठे चमचे तेल टाका. सोबतच दोन चमचे तूप टाका. तेल नॉर्मल गरम झाले असतास त्यामध्ये दोन तेज पत्ता टाका, दोन इंच दालचिनीचा तुकडा टाका ,सोबतच एक मोठी विलायची ,तीन ते चार छोटी विलायची ,पाच ते सहा लवंग , एक तुकडा जावित्री व पाच ते सहा लवंग टाकून घ्या. खडा मसाला मुळे मटणला खूप छान फ्लेवर येतो .खड्या मसाल्याचा स्वाद सुगंध हा मटणाची चव वाढवतं.खडा मसाला टाकून कुकरमध्ये तो चांगला भाजून घ्या. तो थोडा गरम झाला असतास त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाका.
कांदा कुकरमध्ये टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपण मिडीयम वरून हाय करून घ्या ,व कांदा सतत परतत राहा पाच ते सात मिनिटांमध्ये कांद्याचा कलर हा थोडा लाल होईल त्यानंतर गॅसची फ्लेम परत हाय भरून कमी करून घ्या .त्यानंतर कमी फ्लेम वरती कांदा दोन ते तीन मिनिट परतून घ्या .जेणेकरून कांदा हा चांगला भाजेल कांद्याच्या भाजण्यावरती किंवा कांद्याच्या उपयोग वरती मटणाची चव ठेवते. त्यामुळे मटणाच्या भाजी बनवत असताना कांदा हा छान परतून घेत जा जेणेकरून कांदा चांगला शिजला जाईल व त्याची चव मटणाला येईल .आपण कांदा मिक्सर मधून काढून घेत नाहीयेत, मटन करी बनवत असताना पातळ स्लाईस मध्ये कट केलेला कांदा आपण शिजवून घेत आहोत त्यामुळे कांद्यामध्ये एक मसालेदार फ्लेवर राहील .जर आपण कांदा हा मिक्सरमधून बारीक करून घेतला तर त्या कांद्याला एक गोड फ्लेवर येईल त्यामुळे हे गोड फ्लेवर जर मटण करीत टाळायचं असेल तर कांदा हा पातळ स्लाईस मध्ये बारीक करून .
Step 4
जोपर्यंत कांदा चांगला लाल होत आहे तोपर्यंत तुम्ही लसूण आणि अद्रक ची पेस्ट तयार करून घ्या. यासाठी आपण जे लसन गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवलं होतं ते लसणाच्या पाकळ्या चांगल्या मऊ झाले असते, लसणाच्या वरची साल सुद्धा गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे मऊ झाली आहे .त्यामुळे पाण्यासोबतच या लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाका, व आपण बारीक कट केलेला अद्रक चे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्या. लसन आणि अद्रक हे सोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या. जेणेकरून हे मिक्सर चांगले बारीक होईल .लसणा मधले गरम पाणी काढून घेऊ नका गरम पाण्या सहितच हे मिक्सरमधून काढून घ्या. जेणेकरून लसूण बारीक होईल व लसणाच्या पाकळ्या मधील व पाण्यामधिल लसणाचा फ्लेवर जाणार नाही.
यानंतर आपण मटन करी चा मसाला तयार करून घेऊया. यासाठी एका वाटीमध्ये अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट घ्या .हे लाल तिखट तिखट वापरा. जेणेकरून मटन करीला झणझणीतपणा येईल कलर साठी आपण काश्मिरी लाल मिरच्या पावडर वापरणारच आहोत. त्यानंतर यामध्ये दोन चमचे धना पावडर टाका सोबतच एक छोटा चमचा जिरे पावडर ,एक चमचा गरम मसाला पावडर टाकून छान मिक्स करून घ्या जर तुम्हाला जास्त तिखट खायला आवडत असेल तर या मसाल्यामध्ये अजून एक चमचा लाल तिखट मिक्स करा.
Step 5
कुकर बघितले असेल तर आपण परतण्यासाठी टाकलेला कांदा हा चांगला लाल झाला असेल. कांदा चांगला लाल शिजला जाईल त्यानंतर यामध्ये दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट घालून घ्या ,आणि सोबतच आपण कट केलेली हिरवी मिरची टाका . अद्रक, लसण व मिरची ही चांगली मिक्स करून घ्या अद्रक लसूण कांद्यासोबत चांगली परतून घेतल्यानंतर त्यामधून तेल साईटला येईल. याला दोन ते तीन मिनिट वेळ लागेल. या दोन-तीन मिनिटांमध्ये आपला कांदा सुद्धा अजून चांगला शिजेल ,दोन मिनिटानंतर गॅसची फ्लेम सुद्धा कमी करून घ्या. यानंतर यामध्ये बाकी मसाले ऍड करून घ्या .जे आपण बनवले आहेत ,म्हणजेच काश्मिरी लाल मिरची पावडर, गरम मसाला, लाल तिखट, मसाला, हळदी पावडर ,मीठ हे सर्व मसाले यामध्ये टाकून चांगले मिक्स करून घ्या.
यानंतर थोडं पाणी गरम करून घ्या व गरम केलेलं पाणी कुकरमध्ये टाका पाण्याचे प्रमाण थोडे कमी ठेवा पाणी वापरल्यामुळे आपण परतून घेतलेले मसाले हे चांगले शिजतील तेलामध्येच परतले असतात मसाले थोडे करू शकतात परंतु थोडा गरम पाणी घातल्यामुळे मसाले हे चांगले शिजतील व त्याचा फ्लेवर चांगले उतरून येईल. गरम पाण्यामध्ये हे सर्व मसाले कमीत कमी दोन ते तीन मिनिट शिजवून घ्या दोन-तीन मिनिटानंतर या मसाल्यातून तेल साईडला येईल व या मसाल्याचा कलर सुद्धा खूप चांगला दिसून येईल. मसाले चांगले शिजल्यानंतर यामध्ये मॅरीनेट करून ठेवलेला मटण टाका सोबतच अर्धा चमचा मीठ घाला मिठाचा वापर सर्वप्रथम थोडा कमी करावा कारण आपण मॅरीनेट करत असताना मसाले शिजवत असताना मीठ घातला आहे त्यामुळे मीठ चवीनुसारच टाकावे.
Step 6
नंतर चार ते पाच मिनिट हे मटन मसाला मध्ये चांगले परतून घ्या .चार ते पाच मिनिट गॅसची फ्लेम ही हाय असू द्या ,जेणेकरून मटण सॉफ्ट होईल व मसाल्यामध्ये चांगले परतले जाईल .यानंतर यामध्ये गरम पाणी ऍड करा मटन करी बनवत असताना याची काळजी घ्या की पाणी आपण गरमच वापर करावा. मटन करी बनवत असताना पाण्याचे प्रमाण हे थोडे कमी वापरले जाते कारण मटन करी ही ठीक असते ,थोडी कमी रस्याची भाजी असते. त्यामुळे मटण करी बनवत असताना पाण्याचे प्रमाण थोडे कमी वापरावे जेणेकरून आपली करी ही हॉटेल स्टाईल मध्ये बनेल.
कुकरचे झाकण लावून गॅसची फ्लेम हाय करावी व कुकरची एक सिटी होईपर्यंत गॅसची फ्लेम हाय राहू द्यावे. कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून घ्या ,एकदम कमी करून घ्या व त्यानंतर दहा ते बारा मिनिट कमी फ्लेम वरती मटण शिजु द्या. दहा ते बारा मिनिट कमी फ्लेम वरती ठेवल्यानंतर कुकरच्या कमीत कमी दोन ते तीन शिट्ट्या होतील. प्रत्येकाचे कुकर हे वेगळे असते त्यामुळे कमीत कमी बारा ते पंधरा मिनिट मध्ये मटण शिजवून जाईल .टाईम झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या, कुकरच्या झाकण लगेच उघडू नका त्याला शांत होऊ द्या त्यानंतर कुकरचे झाकण उघडून बघा ,मटन एवढ्या वेळात चांगले शिजले तर असेलच ,पण काही कसं राहिले असेल तर त्याला झाकण न लावताच तीन ते चार मिनिट शिजू द्या .परंतु कमी फ्लेम वरती दहा ते पंधरा मिनिट शिजवल्यानंतर मटण हे चांगले शिजतेच.
आता कुकरचे झाकण उघडून बघा मटण छान शिजले असेल .मटन करीचा कलर सुद्धा खूप छान आला असेल. यानंतर यावरती एक अर्धा लिंबूचा रस टाका, बारीक कोथिंबीर चिरून टाका व अर्धा चमचा कस्तुरी मेथी बारीक करून टाका .कस्तुरी मेथी वापरल्यामुळे मटण करीला एक वेगळीच चव येईल. हे सर्व टाकल्यानंतर मटन दोन मिनिट गॅसवर राहू द्या. मटण करी पाहिल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की करी थोडी कमी झाली असेल तर त्यामध्ये गरम पाणी वाढवून थोड्या वेळ गॅस वरती राहू द्या .जर मटन मध्ये करी जास्त झाली असेल असे वाटत असेल तर गॅस हाय फ्लेम वरती ठेवून थोड्या वेळ मटन करी गॅस वरती हलवून घ्या जेणेकरून घरी कमी होईल.
अशाप्रकारे गावरान पद्धतीचे मटन करी तयार आहे.
मटन करी ची प्लेटिंग कशी करावी How to plat mutton curry in village style
गावरान पद्धतीने मटन करी ची प्लेटिंग करायची असेल तर एक पितळाच मोठे ताट घ्यावे ,त्यामध्ये पितळाची एक छोटी प्लेट घ्यावी, त्या छोट्या प्लेटमध्ये मटण करी बनवलेली टाकावी. मटन करी सर्च केल्यानंतर त्यावरती बारीक कट करून कोथिंबीर टाकावे ,त्यामुळे प्लेटिंग सुंदर दिसेल. यासोबतच चवीनुसार ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी ताटामध्ये ठेवावी मटन करी तर चपाती, भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी सगळ्या सोबतच खाल्ली जाते, परंतु बहुतांश लोकांना मटन करी ही ज्वारीच्या भाकरी सोबत जास्त आवडते .त्यामुळे प्लेटिंग करत असताना ज्वारीच्या भाकरीचा वापर करावा .सोबतच साईटला ताटामध्ये कट केलेला कांदा अर्धा लिंबू ठेवावे आणि ताटाच्या साईटला एका बाऊलमध्ये भात ठेवा .अशाप्रकारे गावरान पद्धतीचे मटन करी थाळी तयार आहे.
अर्धा किलो मटन ची करी ही तीन ते चार जण आरामशीर पोटभरून खाऊ शकतात कारण मटन करी चवीला खूप चांगली लागते .कशी वाटली तुम्हाला मटन करी रेसिपी ही नक्की कळवा .एकदा मटन करी हॉटेल स्टाईल कुकर मध्ये घरगुती पद्धतीने नक्की तयार करून पहा तुम्हाला नक्की आवडेल.
FAQ
मटन हे आरोग्यासाठी चांगले आहे का?
Is mutton good for health?
मटन आणि चिकन हे दोन्ही आरोग्यासाठी खूप चांगले असते, कारण मटन मध्ये प्रथिने आणि लोह जास्त प्रमाणात असतात ,आणि त्यासोबतच कॅलरी चरबी आणि कोलेस्ट्रॉल हे खूप कमी प्रमाणात असते, त्यामुळे मटण आणि चिकन हे दोन्ही आरोग्यदायी असते.
भारतामध्ये कोणती मटन करी उत्तम आहे?
Which mutton curry is best in India?
भारतामध्ये सर्वच प्रकारचे मटण करी ही खूप आवडीने खाल्ली जाते .परंतु प्रत्येक खाण्याच्या पदार्थासाठी भारतामध्ये एक ठराविक ठिकाण प्रसिद्ध आहे. त्यामध्ये मटन करी साठी बंगाल ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. अस्सल बंगाली मटन करी हा भारतातील सर्वात लोकप्रिय पदार्थापैकी एक आहे .त्यात समृद्ध मसाल्याने ,औषध वनस्पती मिसळलेल्या जातात ,त्यामुळे मटण ग्रेव्हीला एक वेगळी चव येते.
मटन करी साठी कोणते मटण चांगले आहे?
Which mutton is best for curry?
मटन करी साठी बहुतांश लोक शेळीचे मास वापरतात शेळीच्या मासामध्ये शेळीचा मागचा अर्धा भाग म्हणजेच पाय, कंबर ,हाड मधले किंवा हाडे विरहित मास या सर्वांचा उपयोग केला जातो.
मटन करी मध्ये मटणाचा सर्वात चवदार भाग कोणता आहे?
Which is the tastiest part of mutton?
मटणामध्ये पाण्याचा पावसाळा पासून बनलेला रॅक म्हणजेच पावसाळी कसल्या चिकन हे जास्त चविष्ट लागते चिकन करी मध्ये सुद्धा आपण फासळीचा जास्त प्रमाणात उपयोग केला तर ते जास्त चविष्ट लागेल.
मटण पचायला सोपे आहे का?
Is mutton easy to digest?
हो, इतर माणसाच्या तुलनेत शेळीच्या मासामध्ये कॅलरीज कमी असतात. त्यामुळे शेळीचे मांस म्हणजेच मटण हे पचण्यास सोपे असते.
बंगाल मध्ये सर्वात प्रसिद्ध अशा मटन करीला कोशा मंगशो बोलतात